नागेश साळुंखे क्रिकेट ॲकॅडमी आयोजित पंढरपूर प्रीमियर लीग या स्पर्धेला ला सुरवात मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते उद्घाटन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर येथील सुप्रसिद्ध क्रिकेट अकॅडमी NS क्रिकेट अकॅडमी यांच्या वतीने 16 वर्षा खालील मुलं व मुली च्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत पंढरपुरातील मुलांनामधील असणारी लेदर बॉल क्रिकेटची गुणवत्ता साधार करण्यासाठी व त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी गेली 10 वर्ष या स्पर्धेचे आयोजन N S अकॅडमी च्या माध्यमातून केले जाते या स्पर्धचे उदघाटन पंढरपुरातील लाडके व्यक्तिमत्त्व तसेच मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे, मा. उपनगराध्यक्ष द मर्चंट बँक चे चेअरमन मा.श्री नागेश काका भोसले, सोलापुरातील प्रसिद्ध रणजीपटू तसेच सोलापूर जिल्हा क्रिकेट असो चे निवड समितीचे अध्यक्ष मा श्री उदय डोके सर, यांच्या शुभ हस्ते झाले..
या स्पर्धेसाठी नागेश साळुंखे अकॅडमी मधील खेळाडूंबरोबर तसेच बार्शी,सोलापूर, अकलूज, सांगोला, या ठीकना मुलाचा सहभाग या स्पर्धेसाठी झाला आहे या प्रसंगी अकॅडमी चे आधारतंभअसणारे पालक वर्ग ग्राउंड साठी नेहमी सहकार्य करणारे मा श्री गुरुराज ठिगळे, यांच्या बहुमूल सहकार्य मुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला.
या कार्यक्रमासाठी नौशाद भाई भयानी ,गुरुराज ठिगळे, श्री विशाल पावले,श्री गणेश पवार,श्री संजय गोंजारी,बाळासाहेब शिंदे,नीलकांत गडदे (मोडलिंब) सुहास मोरे,गणेश सुतार सर,सवई साहेब, डॉ गणेश बेणारे डॉ सचिन थिटे,डॉ. श्रीकृष्ण शिंदे,डॉ स्वरूपा बिराजदार मॅडम तृप्ती पवार मॅडम आदी उपश्चित होते
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अकॅडमी चे संचालक व हेड कोच नागेश साळुंखे सर,शुभम टोंनपे,गणेश गायकवाड, अभिजीत नेहतराव,सागर पवार यांनी परिश्रम घेतले.
हा कार्यक्रम आपल्या उत्कृष्ट शैलीत समालोचन व सूत्रसंचालन करण्याचे काम मा श्री शाम गोगाव सरांनी केल.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here