नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषदेस ५ कोटी रुपये मंजूर – आ. समाधान आवताडे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
पंढरपूर व मंगळवेढा शहरातील पायाभूत सेवा व सुविधा अधिकतम चांगल्या पद्धतीने पुरविण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेला २ कोटी ३३ लाख रुपये तर मंगळवेढा नगरपरिषदेला २ कोटी ५७ लाख इतका निधी मंजूर झाला आहे. दोन्ही शहरातील नागरिकांना वीज, आरोग्य, शिक्षण, पाणी आदी सेवा व सुविधा उत्तम पद्धतीने पुरवता याव्यात यासाठी हा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. आवताडे यांनी दिली.
यावेळी बोलताना आ समाधान आवताडे यांनी सांगितले की राज्यामध्ये सत्ताबदल होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारने मागणी मान्य करत भरीव आणि महत्वपूर्ण निधीची तरतूद केली आहे. महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग,नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषद यांना निधी मंजूर झाला असून भारताची दक्षिण काशी म्हणून परिचित असलेले पंढरपूर शहर व संतभूमी मंगळवेढा ही दोन्ही शहरे सर्व सुविधायुक्त अध्यात्मिक व सांप्रदायिक भूमी म्हणून नावारूपास आणण्यासाठी विविध मार्गांनी शासनदरबारी पाठपुरावा करून विकासासाठी सर्वतोपरी कटिबद्ध राहणार असल्याचे आ समाधान आवताडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
*पंढरपूर नगरपरिषद क्षेत्रातील मंजूर कामे*-
 टाकळी बायपास, प्रथमेश मंगल कार्यालय पाठीमागे, विठ्ठल नगरी सोसायटी, पंढरपूर येथे सभामंडप बांधणे १० लाख, स्टेट बँक पंढरपूर ते टिळक स्मारक मंदिर, पंढरपूर अंतर्गत गटार बांधणे १० लाख, डगरी गल्ली ते उमदे गल्ली, पंढरपूर येथे लादीकरण करणे १०लाख, जुनी इसबावी, गावठाण शिंदे वस्ती जवळ इसबावी ओपन प्लेस मध्ये सभामंडप बांधणे १५ लाख, प्रतिभाताई परिचारक नगर ड्रेनेज लाईन टाकणे १५.०० लाख, यमाईदेवी मंदिर सुशोभिकरण व दुरुस्ती करणे १० लाख, प्रभाग क्र.१५ मध्ये गुरुकृपा हौसिंग सोसायटी दत्त मंदिर येथे लादीकरण करणे १०लाख, प्रभाग क्र १५ मध्ये गणेशनगर, पंढरपूर येथे सभामंडप बांधणे १० लाख, गणेश मंदिर, मंगळवेढेकर, सभामंडप बांधणे १०लाख, सांगोला चौक पंढरपूर येथे १२ मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसविणे ३लाख, इसबावी श्रीराम मंगल कार्यालय ते राजू मोरे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे १५ लाख, इसबावी जुने गावठाण शिंदे वस्ती जवळ छोट्या गल्ली पर्यंत रस्ता सुधारणा करणे १० लाख, इसबावी विसावा मंदिर ते हरीनायान पार्क रोड रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, कुंभार गल्ली ते जुना नाका रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, भुयार मारुती ते आनंद महाराज रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, आप्पा अभांगराव घर ते राजेंद्र चौडवार घर रस्ता कॉंक्रिटीकरण १० लाख, करणे कर्मयोगी शाळा ते सतिश श्रीखंडे रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, विनायक दिवाकर घर ते गजानन धोत्रे घर रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, गुरुदेव नगर कोर्टीकर घर ते राऊत घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, विक्रम धाबा ते बहारो ते माळी घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व आराम गाडी कारखाना पिण्याच्या पाण्यासाठी बोर पाडणे इलेक्ट्रिक मोटर बसविणे हौद बांधणे १५ लाख, मीराबाई महाराज मठ ते भोसले चौक रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, प्रोग्रेस शाळा जवळ प्रशांत परिचारक नगर पंढरपूर येथे लादी करण करणे १० लाख रुपये.
*मंगळवेढा नगरपरिषद क्षेत्रातील कामे*
 – विठ्ठल मंदिर सभागृह पेविंग ब्लॉक बसवणे १५ लाख, कल्याण प्रभू देवस्थान शेजारील महादेव मंदिरात सभामंडप बांधणे १५ लाख, मरीआई मंदिर सभामंडप बांधण्यात सनगर गल्ली १५ लाख, सनगर गल्ली ते सांगोला नाका रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, महादेव माने घर ते सार्वजनिक शौचालय पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, राजू पवार घराजवळील नवरंग मंडळ श्रीकृष्ण नवरात्र मंडळात सभागृह १० लाख, सुतार गल्ली येथे इंगळे वाडा ते देशमुख वाडा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, गोवे गल्लीतील कापूर विहिरी वरती पत्रा शेड करणे कंपाउंड करणे १० लाख, अशोक शेळके घराजवळ समाज मंदिर (बागेजवळ) १० लाख, शशिकांत चव्हाण घरासमोरील सांगोला रस्त्यापर्यंत कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, साठे नगर येथे समाज मंदिर बांधकाम करणे १५ लाख, खोमनाळ नाका येथे सांस्कृतिक भवन बांधणे १५ लाख, भारत इंगळे सर ते अर्जुन हजारे कोपरा इंगळे गल्ली रस्ता व गटार करणे १५ लाख, खंडोबा गल्ली हरी पाटील घर ते मारुती वाकडे घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, कारखाना चौक ते नागणेवाडी पाण्याच्या टाकी पासून पोलीस स्टेशन पर्यंतचा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १५ लाख, गुंगे गल्ली येथील कसगावडे बोळ रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, डॉक्टर अभिजीत सावंजी ते हॉटेल सावंजी पर्यंत बंदिस्त गटार बांधणे २० लाख, कोंडूभैरी गल्ली येथे बोरवेल इलेक्ट्रिकल मोटर बसवणे व पाण्याची टाकी बांधून पाणीपुरवठा करणे होनमाने गल्ली येथे राम मंदिर शेजारी नऊ मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसविणे, मंगळवेढा विजापुर रोड लागत विठ्ठल मंदिराजवळ नऊ मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसवणे, दामाजी मंदिर मागे विहिरीजवळ नऊ मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसविणे, दामाजी मंदिराशेजारील दक्षिण बाजूच्या जुन्या गेटजवळ नऊ मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसविणे, अण्णासाहेब पाटील वस्तीगृहाजवळ नऊ मीटर उंचीचा हायमास्ट बसवणे, बाबुभाई मकानदार घराजवळ मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसविणे, सूर्यभान भोसले यांच्या घराजवळ कृष्ण नगर येथे नऊ मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसविणे, नूतन मराठी विद्यालय मुढे गल्ली येथे मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसवणे, शंकरलिंग मंदिराजवळ आठवडा बाजार येथे नऊ मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसविणे, महालक्ष्मी मंदिराजवळ मुरडे गल्ली येथे नऊ मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसविणे, सांगोला नाका येथे बारा मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसविणे, गणेश विहिरी समोर जय भवानी तरूण मंडळ देवी शेजारी नऊ मीटर उंचीचा हायमास्ट देवा बसविणे या कामांसाठी १० लाख रुपये व शशिकांत चव्हाण यांच्या घरासमोर सभागृहाच्यावर योग बांधणे १० लाख
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here