नवजीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या वतीने भव्य बाल हृदय रोग निदान व उपचार शिबिर संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

पंढरपुर येथील सुप्रसिध्द बालरोग तज्ज्ञ डॉ शितल शहा नवजीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटल व कमल क्रांती मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 26 डिसेंबर 2021 रोजी नवजीवन हॉस्पिटल मध्ये मोफत बाल हृदयरोग निदान व उपचार शिबिर संपन्न झाले आहे.

या शिबिरास पंढरपुर शहर तालुक्यातील हजारो नवजात बालकांच्या माता पित्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला.

या शिबिरामध्ये,हृदयाची सोनोग्राफी (2D CARDIOLOGY) (Advanced GE Sonography Machine – GE Vivid T8 Pro) या मशिनद्वारे उपस्थित तज्ञ डॉ.सुनील पटवा, डॉ.सुनील आसबे, डॉ.विनायक उत्पात, डॉ.रवीराज भोसले यांच्याकडून मोफत हृदयरोग निदान व महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार करण्यात येणार आहे

0 ते १८ वर्षे वयोगटातील सर्व लहान मुलांच्या पालकांनी याचा लाभ घ्यावा. यामध्ये लहान मुलांना होणारे आजार बाळ निळसर पडणे, वजन न वाढणे, जोरात जोरात श्वास लागणे, दूध व्यवस्थित न पिणे, दूध पिताना कपाळावर घाम येणे, वारंवार निमोनिया होणे,ASD,PDA,VSD,हे आढळणा-या आजारावर उपचार होणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here