धाराशिव साखर कारखान्याचा सर्व वाहनांना पोलीस निरीक्षक रवी राजूरकर यांच्या हस्ते रिफ्लेक्टर बसविण्यात आले.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

आपल्या धाराशिव साखर कारखाना युनिट क्र.४ सांगोला येथे ऊस वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टर वाहनांना रिफ्लेक्टर सांगोला पोलीस सहाय्यक श्री.रवि राजुरकर, श्री. सुखदेव गगंणे, पोलीस श्री.लक्ष्मण वाघमोडे वयांच्या उपस्थित बसविण्यात आले.

ऊस वाहतूक करीत असताना अनेक वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याकारणाने अनेक अपघात होत असतात, त्यामुळे अनेक कुटूंब उध्वस्त होताना पाहतो असे अपघात होऊ नयेत याकरिता वाहन चालकांनी वाहतुकीचे सर्व नियम पाळले जावेत याबाबत जनजागृती व कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले. पोलीस प्रशासनाने मार्गदर्शन केले.

याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.अमर पाटील साहेब, जनरल मॅनेजर श्री.अविनाश शिंदे, श्री.पोपट घाडगे, श्री.सजंय कारंडे, श्री.नितीन पवार आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here