देशाचे मा.खा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पेनुर जिल्हा परिषद गटात नागरीकांचा जनता दरबार!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

सर्व गोरगरीब कष्टकरी व दीनदलित दुबळ्यांचे सरकार दरबारचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी देशाचे नेते केंद्रीय माजी कृषीमंत्री शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून मोहोळ तालुक्यातील पेनुर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावांमध्ये नागरीकांचा जनता दरबार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश दादा पाटील यांनी आयोजित केला असून, दिनांक 27 डिसेंबर 2021 पासून 2 जानेवारी ते 2 जानेवारी 2022 पर्यंत जनता दरबार पेनुर जिल्हा परिषद गटातील आढेगाव, पाटकुल, सौंदणे, टाकळी सिकंदर, वरकुटे,शेजबाभुळगांव, तांबोळे, ओढी,पेनुर,अंकोली,नजिक पिंपरी, आदी सर्व गावांमध्ये हा जनता दरबार भरविण्यात आला असून यामध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते उमेश दादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी व मोहोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती मानाजी बापू माने, त्यांचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस, व प्रथम नगराध्यक्ष, रमेश बारसकर हे पण उपस्थित राहणार आहेत.यावेळी पेनुर जिल्हा परिषद गटातील सर्व पदाधिकारी, कार्यकते उपस्थित राहणार आहेत..

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here