देशाचे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी यांच्या केदारनाथ येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाचे आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

दीपावली पाडवा या शुभमुहूर्तावर आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते श्री.क्षेत्र केदारनाथ धाम येथे होणाऱ्या श्रीमद आद्यगुरू शंकराचार्य यांच्या समाधी व मूर्तीचे अनावरण तसेच विविध विकास कामाचे उदघाटन सोहळा संपन्न झाला

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केदारनाथ येथून पंढरपूर मंगळवेढ्याचे लोकप्रिय आमदार समाधान दादा आवताडे व जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक मालक आणि पंढरपूर शहर व तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने श्री. क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, पंढरपूर येथे आयोजित केले होते.
सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भाजपा चे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.

यावेळी वारकरी व फडकरी संप्रदाय यांचा सत्कार खासदार स्वामी महाराज व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार समाधान दादा आवतडे व जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक आणि तरुण तरडफदार भाजपा चे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांच्या शुभहस्ते 15 वारकऱ्यांचे शाल व नारळ देऊन सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख शशिकांत नाना चव्हाण सुभाष मस्के सर मा. सभापती प्रदीप खांडेकर,मी.जि. प.सदस्य सचिन शिवशरण,उपस्थित आजी माजी नगरसेवक भाजपा चे ग्रामीण व शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here