दामाजी कारखान्याला स्व.मारवाडी वकिलसाहेब यांच्या काळातले वैभव मिळवुन देण्याचा प्रयत्न करणार : चेअरमन मा.श्री.शिवानंद पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

संत दामाजी साखर कारखान्याची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि। २९/०९/२०२२ रोजी दु.१ वाजता कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद यशवंत पाटील यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या व उत्साही वातावरणात संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला स्व.कि.रा.मर्दा, स्व.रतनचंद शहा, संत दामाजीपंत-श्री विठ्ठल पंत यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले.सभेसाठी उपस्थित सभासदांचे स्वागत कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री सुनिल दळवी यांनी करुन कारखान्याची ऑफ सिझनमधील पूर्ण झालेली कामे व येणा-या गळीत हंगामाच्या तयारीविषयी माहिती सांगितली.
या सर्वसाधारण सभेप्रसंगी माजी चेअरमन,धनश्री परिवाराचे मार्गदर्शक प्रा।शिवाजीराव काळुंगे म्हणाले, तालुक्यातील सभासदांनी योग्य निर्णय घेवून या संचालक मंडळाला काम करण्याची संधी दिली आहे. अडचणीत असणा-या या कारखान्याला आर्थिक मदत करण्यासाठी आमचेवर सोपविलेली जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत. शेतक-यांचे ऊस बिल या संचालक मंडळाने दिले आहे. तसेच ऊस तोडणी वाहतूक यंत्रणाही चांगल्या प्रकारे उभी केली आहे. यावर्षी ६ लाख मे.टन गाळपाचे या संचालक मंडळाचे उद्षि्ठ आहे. प्रत्येक वर्षी ५ लाख मे.टन किंवा आसपास गाळप होणे गरजेचे आहे. संचालक मंडळाने कारखाना चांगल्या पध्द्तीने चालविण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. आणि ते पेलतील अशी आशा त्यांनी शेवटी व्यक्त केली.

प्रास्तावीक व मनोगतामध्ये चेअरमन श्री शिवानंद पाटील म्हणाले कि, आपल्या सर्वांच्या सहकार्य, कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री.तानाजी खरात व संचालक मंडळ यांचे मदतीने दामाजी कारखान्यास मारवाडी वकिलसाहेब यांच्या काळातील वैभव प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न करणार आहे. संस्थेचा लेखा-जोखा सभासदांसमोर मांडताना म्हणाले कि सुमारे १९८ कोटी रुपयाचे कर्ज या संस्थेवर मागील संचालक मंडळाने करुन ठेवले आहे. पुढे येणा-या गळीत हंगामातील उत्पादीत साखर,मोलासेसवर देखील अùडव्हान्स उचल केली आहे. सभासदांच्या आशिर्वादाने या कारखान्याची सुत्रे या संचालक मंडळाने हाती घेतली त्यावेळी ३ लाख रुपये फक्त कारखान्याच्या खात्यावर शिल्लक होते. जिल्हयाचे नेते माजी आमदार श्री प्रशांतमालक परिचारक, विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन श्री भगिरथदादा भालके धनश्री पतसंस्थेचे संस्थापक मा.प्रा.श्री.शिवाजीराव काळुंगे सर, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन मा.राहुल शहा शेठजी, जिजामाता पतसंस्थेचे मार्गदर्शक मा.रामकृष्ण नागणेमामा, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन मा.दामोदर देशमुख बापु, कारखान्याचे माजी चेअरमन मा.ॲड.नंदकुमार पवारसाहेब, माजी संचालक श्री.यादाप्पा माळी सावकार, माजी संचालक मा।प्रकाशआप्पा गायकवाड, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य मा.अजितआप्पा जगताप, उद्योजक श्री।संजय कटटे्सर यांचे मार्गदर्शन व सहकार्याने हे संचालक मंडळ काम करीत आहे. या सर्वानी सहकार्य केल्याने आपण येणारा गळीत हंगाम जोमाने सुरु करण्याच्या तयारीत आहोत. कमी कालावधीत कारखान्याच्या कामगार वर्गानी चांगल्या प्रकारे काम केल्याने हा गळीत हंगाम वेळेत सुरु करण्यास मदत झाली आहे. शेतक-यांची ऊस बिले अदा केली असून एफ.आर.पी. ची राहिलेली रु. १११/- गळीत हंगाम सुरु करण्याच्या अगोदर अदा करण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. या गळीत हंगामामध्ये ६ लाख मे।टन गाळप करण्याचे ध्येय संचालक मंडळाने ठेवलेले आहे. हा कारखाना आपला आहे, सभासदांच्या मालकीचा आहे. त्यामुळे सभासद-शेतक-यांचीही आपला ऊस दामाजी कारखान्याला गळीतास देण्याची जबाबदारी वाढली आहे. खाजगी कारखान्यांच्या स्पर्धेत टिकून स्व।मारवाडी वकील साहेब, स्व।रतनचंद शहा शेठजी यांच्या काळातील वैभव पुन्हा मिळविण्याची जबाबदारी आपणां सर्वांची आहे. या संचालक मंडळाने सभासदत्व खुले ठेवले असुन आजअखेर नविन शेअर्स मिळणेसाठी रक्कम भरुन ८१०० शेतक-यांनी अर्ज केले आहेत. येणा-या दिपवाळीपर्यंत कार्यक्षेत्रातील इच्छुक शेतक-यांनी शेअर्स रक्कम भरुन सभासद अर्ज कारखान्याकडे सादर करावेत म्हणजे सभासदत्व देणे सोईचे होईल. कारखान्याचे डिस्टीलरी प्रकल्पाचे हेरिंग येत्या १८ ऑक्टोबर रोजी होणार असुन प्रकल्प पुर्ण करणेसाठी हे संचालक मंडळ पाठपुरावा करीत असल्याचे शेवटी चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी सांगितले. तसेच सभासदांकडून आलेल्या धोरणात्मक सुचना,प्रश्नांचे वाचन व खुलासा चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी करुन समर्पक उत्तरे दिली.
विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन कार्यकारी संचालक श्री सुनिल दळवी यांनी केले. विषयपत्रिकेवरील विषयातील आर्थिक बाबींची व लेखा परिक्षण अहवालातील दोषांची कायदेशिर जबाबदारी तत्कालीन संचालक मंडळावर ठेवुन वृत्तांत कायम करण्यात यावा मंजूर करण्यात आले.
सदर प्रसंगी कारखान्याचे मा. चेअरमन मा।शिवानंद पाटील व संचालक मंडळाने दोन महिन्याचे कालावधीत केलेल्या कामकाजामध्ये ऊस बिले, तोडणी वाहतुक बिले, कर्मचा-यांचा पगार केलेबध्द्ल जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य श्री.अजित जगताप यांनी संचालक मंडळाचे अभिनंदनाचा ठराव मांडला व त्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य श्री लतिफ तांबोळी यांनी अनुमोदन देवुन टाळयांच्या गजरात सदरचा ठराव मंजुर करण्यात आला. तसेच मांगील संचालक मंडळाचे कालावधीतील सहा वर्षाचे लेखापरिक्षण नविन लेखापरिक्षकांकडुन करुन घेण्याची सुचना श्री अजित जगताप यांनी मांडली. त्यास श्री.भारत पाटील यांनी अनुमोदन दिले.

या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री तानाजी खरात, संचालक सर्वश्री पी.बी.पाटील, औदुंबर वाडदेकर, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणु पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर यांचेसह माजी संचालक मारुती वाकडे, भारत पाटील, जालिंधर व्हनुटगी, एकनाथ होळकर, शहाजी यादव, आणि शिवाजी नागणे, दत्तात्रय यादव, शिवाजीराव पवार, तसेच दादा गरंडे, राजू पाटील, मनोज ठेंगील, महावीर ठेंगील, काशिनाथ पाटील, शरद पुजारी, शेखर कोकरे, विलास पाराध्ये, पिंटू नांदे, दादा गायकवाड, संतोष पाटील, राजेंद्र रणे, उत्तम घेाडके, सिध्देश्वर कोकरे, हरीभाऊ यादव, कल्याण रोकडे, तात्या शिंदे, एकनाथ फटे सर, विठ्ठल डोके, दौलत माने, बंडोपंत करे, राजू सारवडे, रावसाहेब लिगाडे, राजेंद्र तोडकरी, महादेव नाईक, श्रीकांत सावळे, दुर्योधन पुजारी, हणमंत पाटील, गुरय्या स्वामी तसेच अनेक सभासद- शेतकरी, तोडणी वाहतूक ठेकेदार, अनेक संस्थांचे पदाधिकारी, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी, कामगार संघटना , पतसंस्था पदाधिकारी उपस्थित होते.
सदरची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरळीत पार पडणेसाठी कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
आभार संचालक श्री भारत बेदरे यांनी मानले तर सुत्रसंचालन श्री अशोक उन्हाळे यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने सभेच्या कामकाजाची सांगता झाली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here