दामाजी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आ.प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली स्वतंञ पॕनल लढविण्याची कार्यकर्त्यांच्या तिव्र भावना

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या आगामी होवु घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात कार्रकर्त्यांशी विचारविनीमय करण्यासाठी पांडुरंग परिवाराच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना तिव्र व्यक्त करीत आ.प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली दामाजी कारखान्याच्या निवडणूकीमध्ये स्वतंत्र पॕनल लढविल्यास कारखाना सुस्थितीत येणार आहे.आम्हाला कुणीही गृहीत धरु नये अशा तिव्र भावना कार्यकर्त्यांनी व सभासदांनी मांडल्या.
यावेळी बोलताना शिवानंद पाटील म्हणाले,पांडुरंग कारखाना ज्या पध्दतीने चालु आहे.त्याच पध्दतीने दामाजी कारखाना चालला पाहीजे.दामाजी कारखाना ज्या ज्या वेळी अडचणीत आला त्या त्या वेळी स्व.सुधाकरपंत परिचारक(मालक) व आ.प्रशांत परिचारक(मालक) यांनी मदत करण्याचा निर्णय घेतला.हि निवडणुक कारखान्याची असुन संस्थात्मक कारभार आ.प्रशांत परिचारक मालका शिवाय कोणीही करु शकणार नाही.त्यामुळे मालक जो निर्णय घेतील तो आपणाला मान्य असणार आहे.
यावेळी बोलताना युन्नुसभाई शेख म्हणाले,देशामध्ये पांडुरंग सहकारी साखर कारखाना एक आदर्श कारखाना म्हणुन आ.प्रशांत परिचारक यांनी चालविला आहे.त्यासाठी त्यांची एकहाती सत्ता असणे अत्यंत गरजेचे आहे.एकहाती सत्ता असल्याशिवाय दामाजी कारखान्यास भवितव्य राहणार नाही.आम्हाला निवडणुकीमध्ये कुणीही गृहीत धरु नये,आ.प्रशांत परिचारक कारखान्याच्या बाबतीत जो निर्णय घेतील तो आपणाला मान्य आहे.
यावेळी औदुंबर वाडदेकर म्हणाले,पोटनिवडणुक विधानसभेला आ.प्रशांत परिचारक मालकांनी राञीचा दिवस करुन सर्व कार्यकर्त्यांना कामाला लावले त्यांचा आदेश सर्व कार्यकर्त्यांनी पाळला व आ.समाधानदादा आवताडे यांना निवडुन दिले.राज्यातल्या झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल पाहता,तिन पक्षाची मिळुन सत्ता असताना,अर्धे डझन मंञीमंडळ तळ ठोकुन असताना परिचारक गटामुळेच आ.समाधानदादा आवताडे यांना निवडणुक जिंकता आली.पण कारखान्याच्या बाबतीत मालक जो निर्णय घेतील त्यांच्याच पाठिमागे आपण जाणार आहोत.अंतिम निर्णय आ.प्रशांत परिचारक मालक सांगतिल तोच होणार आहे.
यावेळी राजेंद्र पाटील बोलताना म्हणाले,पक्षीय राजकारण यामध्ये न आणता आ.प्रशांत परिचारक यांनी स्वतंत्र पॕनल लढवावा.त्त्यांच्याशिवाय पर्याय नाही.शेतकरी जिवंत राहीला पाहीजे,शेतकरी,कामगारांच्या भावना लक्षात घेता आ.प्रशांत परिचारक यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. आ.प्रशांत परिचारक स्वतःच उभे आहेत असे समजुन आ,समाधान आवताडे यांना जिवाचे रान करुन निवडुन दिले.संस्था योग्य चालविणे हे आपलं काम असतं परंतु दामाजी कारखान्यामध्ये तशा पध्दतीचे काम झालेलं नाही.संस्था हि सभासदांची आहे तुम्हाला त्या ठिकाणी पाच वर्षे काम करण्यासाठी पाठविले आहे.१९००० सभासदांना आपण अक्रियाशील ठरविले व १८०० सभासद हे फाऊंडर सभासद असताना त्यांना अपुर्ण शेअर्सपायी कमी करणे हे आम्हाला कदापी मान्य नाही असे मत राजेंद्र चरणु पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी काशिनाथ पाटील,सिध्देश्वर कोकरे,सुधिर करंदीकर,संतोष मोगले,हरीभाऊ यादव,मधुकर चव्हाण,विठ्ठल सरगर,दिगंबर भाकरे,बाळासाहेब यादव,तानाजी पवार,संभा लवटे,शंकर आसबे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषद माजी सभापती शिक्षण व आरोग्य शिवानंद पाटील,जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य युन्नुस शेख,जिल्हा दुध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर,दामाजी शुगरचे माजी संचालक रामकृष्ण नागणे,जालींदर व्हनुटगी,जगन्नाथ कोकरे,एकनाथ होळकर,राजेंद्र चरणु पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य बापुराया चौगुले,शिवाजीराव नागणे,नामदेव जानकर,नेमिनाथ आकळे,पं.स.माजी उपसभापती काशीनाथ पाटील,रामभाऊ माळी,माजी नगराध्यक्ष धनंजय खवतोडे,न.पा.शिक्षण मंडळाचे माजी सदस्य नंदकुमार हावनाळे,माजी उपनगराध्यक्ष मुझप्फर काझी,दुध संघाचे संचालक जयंत साळे,भाजपाचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल,शहराध्यक्ष गोपाळ भगरे,तालुका सह.सुतगिरणीचे संचालक पप्पु स्वामी,भाजपा जिल्हा चिटनीस संतोष मोगले,गौडाप्पा बिराजदार,सिध्देश्वर कोकरे,विठ्ठल बिराजदार,भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अशोक माळी,आ.प्रशांत परिचारक युवा मंचचे अध्यक्ष बबलु सुतार,अनु.जाती मोर्चाचे जिल्हा सरचिटनीस श्रीकांत साळे,भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विठ्ठल सरगर,महादेव लुगडे,उत्तम घोडके,काका मिसकर,राजु पाटील,शरद पुजारी,सुरेश कांबळे,संभा लवटे,गोविंद भोरकडे,बाळासाहेब चौगुले,श्रीकांत गणपाटील,तायाप्पा गरंडे,दिगंबर भाकरे,सचिन बोडके,शरद डोईफोडे,शिवाजी जाधव,विष्णु मासाळ,तानाजी कांबळे,तम्मा जगदाळे,संभा रोकडे,भगवान चौगुले,शिवाजी सरगर,रघुनाथ बेलदार,वसंत बंडगर,सिध्देश्वर मेटकरी,शशिकांत कस्तुरे,प्यारेलाल सुतार,सुनिल कांबळे,उमेश विभुते,पांडुरंग मासाळ,नितीन घुले,नागेश कनशेट्टी,नानसाहेब मेटकरी,सोमनाथ क्षिरसागर,प्रकाश भिंगे,भाऊसो रेवे,दुशासन दुधाळ,दिलीपकुमार धनवे,रावसाहेब कांबळे,मधुकर चव्हाण,नंदु गवळी,पिंटु गवळी,नागेश गुरव,बाळु नागणे,दत्ता भाकरे,हणमंत मोरे,विनोद बिराजदार,मल्हारी कांबळे,सुमंगल पटवर्धन,सागर ननवरे,यांचेसह कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here