दामाजी कारखान्याचे मयत सभासदांच्या वारसांना नुकसान भरपाईपोटी चेअरमन मा. श्री. समाधान आवताडे यांचे हस्ते चेकचे वितरण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
श्री।संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने युनाटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि, या  विमा कंपनीकडे कारखान्याचे संपुर्ण सभासदांचा जनता अपघात विमा उतरविलेला आहे.
या पॉलीसीअंतर्गत शरीराचा एक भाग (हात,पाय,डोळा) अपघाताने निकामी झाल्यास कंपनीकडुन संबंधीतांना रु।५०,०००/- व दुर्दैवाने एखादया सभासदांचा अपघाती मृत्यु झाल्यास रु।१,००,०००/- नुकसान भरपाई मिळते. कारखान्याचे विद्यमान मा. संचालक मंडळाने निवडणुक जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सर्व सभासदांचे संरक्षणासाठी ही विमा पाॅलीसी घेतली असुन ब-याचशा सभादांचे वारसांना अर्थिक अडचणीचे काळात नुकसान भरपाई मिळवुन देण्याचे काम कारखाना व्यवस्थापनाने केलेले आहे। मागील कालावधीत अपघाताने मयत झालेल्या सभासदांच्या वारसांना नुकसान भरपाईच्या चेकचे वितरण मंगळवार दि.१४/१२/२०२१ रोजी कारखान्याचे चेअरमन मा।आमदार श्री।समाधानदादा आवताडे यांचे हस्ते करण्यात आले असुन यामध्ये मयत सभासदांचे वारस श्रीमती आशा धनाजी माने-कचरेवाडी। श्रीमती सुनिता भारत मोरे-घरनिकी, श्रीमती रुपाली बाबासाहेब पाटील-ल।दहिवडी, श्रीमती महानंदा रामचंद्र डुम-गुंजेगांव यांना प्रत्येकी रु।१,००,०००/- (रुपये एक लाख) नुकसान भरपाईपोटी मिळवुन देण्यात आलेची माहिती कारखान्याचे प्र।कार्यकारी संचालक श्री।रमेश गणेशकर यांनी दिली। सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक सुरेश भाकरे, परचेस आॅफीसर भारत निकम,अकौंटंट विठठ्ल जाधव व वारसांचे नातेवाईक उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here