दामाजी कारखान्याची निवडणुक डोळयासमोर ठेवून खमंग प्रसिध्दी मिळवण्यासाठी खटाटोप – श्री. राजेंद्र पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

दामाजी कारखान्याची निवडणुक डोळयासमोर ठेवून खमंग प्रसिध्दी मिळवण्यासाठी खटाटोप – श्री. राजेंद्र पाटील

तालुक्यातील एकमेव सहकारी तत्वावर चालु असलेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून कारखान्याची आगामी होणारी निवडणुक डोळयासमोर ठेवून खमंग लोकप्रियता मिळवणेसाठी सभासदांची दिशाभूल करण्याकरता खोटे आरोप करण्याचा खटाटोप चालु असलेचे मत कारखान्याचे संचालक श्री राजेंद्र सर्जेराव पाटील यांनी व्यक्त केले।
तालुक्यात सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे कारखाना कार्यक्षेत्रात कमी ऊस क्षेत्र असतानाही केवळ सभासदांच्या हितासाठी तसेच तालुक्यातील कोणत्याही ऊस उत्पादक शेतक-यांचा ऊस गळीतावाचुन राहू नये म्हणून प्रसंगी तोटा सहन करुन कारखान्याचे पाचही गळीत हंगाम चालु ठेवले। कारखान्याकडे एकही सहप्रकल्प नसताना मागील चारही हंगामातील एफआरपी पुर्ण केली असुन प्रसंगी जादा ऊस बिलही दिले आहे। सन २०२०-२१ हंगामाची एफ आर पी रु।२११९/- प्रतिटन असुन डिसेंबर २०२० अखेर गळीतास आलेल्या ऊसास रु।२०००/- प्रमाणे रक्कम अदा केली आहे। तसेच जानेवारी २०२१ पासुन पुढील गळीतास आलेल्या ऊसास रु।१५००/- प्रमाणे अùडव्हान्स बिल दिलेले आहे। लवकरच एफआरपी पुर्ण करित आहोत। तालुक्यातील इतर खाजगी कारखान्यांच्या क्षमतेच्या तुलनेत दामाजी कारखान्याने दरवर्षी जास्तीचे गाळप केलेले आहे।
एम।एस।सी बँकेचे धोरणामुळे हंगाम २०१९-२० व हंगाम २०२०-२१ मध्ये मालतारण कर्ज मिळु शकले नाही। तरीसुध्द्ा इतर कारखान्याचे तुलनेत दामाजी कारखान्याने चांगले गाळप केलेले आहे। मालतारण कर्ज घेतलेले नसलेने व्याजात मोठया प्रमाणात बचत झालेने इतर कारखान्याचे तुलनेत शेतकÅयांना अùडव्हान्स बिल वेळेत दिलेले आहे। आसपासच्या इतर कारखान्याच्या तुलनेत दामाजी कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळाने शेतकÅयांना नेहमी आधार देण्याचे काम केले आहे। दामाजी कारखान्याचे सभासद सुज्ञ असुन त्यांचा कारखान्याचे संचालक मंडळावर विश्वास आहे। स्वतःला आण्णा हजारे समजुन चालणार नाही त्यासाठी लागणारे विचार आचरणात आणणेची गरज असते।
तालुक्यातील गोरगरीब शेतकÅयांना बळीराजा पतसंस्थेमार्फत कर्ज देवून दुष्काळी व कोरोना या संसर्गजन्य आजाराने शेतकरी भयभीत झाला असताना व दामाजी कारखान्याचे तोडणी वाहतुक यंत्रणेसाठी आपल्या पतसंस्थेने आपल्याच संचालक पदाचे काळात पुरवठा केलेले कर्ज शेतकरी फेडू शकत नाही हे माहित असताना सुध्द्ा शेतक-यांना सवलत देण्याऐवजी पतसंस्थेचे कर्ज वसुलीसाठी कोर्टात दावे दाखल केले व आपल्या मुलाच्या वकिली व्यवसायाची भरभराट केली। याशिवाय आपले दामाजी कारखान्याचे संचालक पदाचे काळात तोडणी वाहतुक यंत्रणेला दिलेल्या कर्जाचे पुर्नगठण करणेबाबत पतसंस्थेने दामाजी कारखान्यास लेखी मंजुरीपत्र दिले। सदर कर्जाचे पुर्नगठण करणेसाठी रु।२ कोटी ५० लाख कर्ज भरुन घेतले व कर्जाचे पुर्नगठन करणेस टाळाटाळ करुन कारखान्यास अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर सदरहु ऊस तोडणी वाहतुक ठेकेदांरांवर कर्जवसुलीसाठी दावे दाखल करुन एकतर्फी निकाल घेवुन त्यांच्या ७/१२ उताÅयावर बोजा चढविण्याचे पाप करुन आपल्या मुलाचा वकीली व्यवसाय वाढविला।
मागील पंधरवडयात दामाजी कारखान्यावर २०० कोटी कर्ज असलेची बातमी दिली होती। आज आपण १२५ कोटी कर्ज असलेचे बोराळे / सिध्दापूर येथील सभेत शेतक-यांसमोर बोलताना सांगता आहात। सभासद शेतकÅयांना कारखाना परिस्थितीची जाणीव आहे। आपणही कारखान्याचे संचालक म्हणून पाच वर्ष कारभार केलेला आहे। जिल्हयातील साखर कारखानदारीची परिस्थिती आपणास ज्ञात असून अशा भुलथापाला जनता भिक घालणार नाही।
कारखाना निवडणुकीत जाहिर केलेप्रमाणे सभासदांचे हिताचेदृष्टीने वचननाम्यातील मुद्याची पुर्तता या संचालक मंडळाने केलेली आहे। कारखाना व्यवस्थापन व कामगार यांचेमध्ये वेळोवेळी चर्चा होवुन पगाराबाबत सामंजस्याने कामकाज चालु आहे। पगाराचा मुदद्ा घेवुन कामगारांची सहानुभुती मिळवणेसाठी प्रयत्न करित आहात। आपले संचालक मंडळाचे काळात कामगारांना पगार कमी असतानासुध्द्ा बरेच महिने पगार थकीत होते याची आठवण असावी। कारखाना स्थापनेपासुन कारखान्यातील कामगार राजकीय दबावाला बळी पडले नाहीत व स्वार्थ साधला नाही।याची दुर्दैवाने आपणास कल्पना नसावी असे वाटते। आपण संचालक असताना किंवा आजपर्यंतच्या काळात कोणत्याही सहप्रकल्पाचा साधा प्रस्तावही दिला नाही। आज आम्ही डिस्टीलरी प्रकल्पाचे काम अंतीम टप्यात आणले आहे। याचा फायदा भविष्यात ऊस उत्पादक शेतकरी, सभासद,कामगार,ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार व कारखानदारीवर अवलंबुन असणाÅया सर्व घटकांना नक्कीच फायदा होणार आहे।
वास्तविक पाहता साखर कारखानदारी सध्या फारच अडचणीत असताना सुध्दा आम्ही पाचही गळीत हंगाम यशस्वी केले आहेत। कारखान्याची निवडणुक डोळयासमोर ठेवून दिशाभुल करण्याचे विरोधकांचे कुटील कारस्थान दामाजीचा सभासद कदापी सहन करणार नाही याची आम्हास खात्री असलेचे प्रतिपादन श्री राजेंद्र पाटील यांनी शेवटी केले।

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here