दामाजी कारखाना साखर उता-यात जिल्हयात दुस-या क्रमांकावर – सोमनाथ आवताडे कारखान्याचा सन २०२१-२२ चा गळीत हंगाम सांगता समारंभ संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ सालच्या २९ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ शुक्रवार दि।२५ मार्च २०२२ रोजी दु।४ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा चे सभापती श्री सोमनाथ आवताडे यांचे प्रमुख उपस्थितीत व व्हा।चेअरमन मा।श्री अंबादास कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला। तत्पूर्वी दु।३ वाजता कारखान्याचे संचालक मा।श्री रामकृष्ण चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी मा।सौ।सुभद्रा चव्हाण या उभयतांचे शुभहस्ते श्री सत्यनारायण महापुजा करण्यात आली।
सदर प्रसंगी काटा पुजन, शेवटच्या ट्रùक्टर व बैलगाडीचे पुजन कारखान्याचे व्हा।चेअरमन श्री अंबादास कुलकर्णी,श्री रामकृष्ण व सौ।सुभद्रा रामकृष्ण चव्हाण तसेच संचालक मंडळ व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले।
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मंगळवेढा मार्वेŠट कमेटिचे सभापती श्री सोमनाथ आवताडे  आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, हंगामाचे सुरुवातीला तालुका व परिसरातील हितचिंतकांनी अनेक वावड्या उठविल्या, दामाजी कारखाना चालूच होणार नाही अशा वल्गना केल्या। तरीही या संचालक मंडळाने ऊस पुरवठा करणारे सभासद शेतकरी, कर्मचारी व ऊस तोडणी वाहतुक ठेकेदारांच्या सहकार्यामुळे चांगल्या प्रकारे कारखाना चालविला। शेतक-यांच्या ऊसाची बिले, कर्मचा-यांचे पगार,ऊस तोडणी वाहतुक ठेकेदारांची बिले वेळेवर देवुन विश्वास संपादन केला। ऊस तोडणी प्रोग्रामचे नियोजन, कारखान्याच्या वजन काटयावर शेतक-यांचा असलेला विश्वास व कर्मचा-यांचे सहकार्याने दामाजी कारखान्याने चांगल्या प्रकारचे गाळप करुन सोलापुर जिल्हयात दुस-या क्रमांकाचा साखर उतारा मिळविला आहे। ही बाब निश्चीतच गौरवास्पद आहे।  
कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्तावीकामध्ये प्र।कार्यकारी संचालक श्री रमेश गणेशकर म्हणाले कि,कारखान्याचे चेअरमन,मा।आमदार श्री आवताडे,संचालक मंडळ यांच्या कुशल नियोजनामुळे या गळीत हंगामामध्ये चांगले गाळप झाले आहे। सरासरी साखर उता-यामध्ये सोलापूर जिल्हयामध्ये संत दामाजी कारखाना हा दुस-या क्रमांकावर आहे।  हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊस उत्पादक सभासद,ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार,सिझन कंत्राटी ठेकेदार,सर्व खातेप्रमुख,विभागप्रमुख, कर्मचारी यांचे योगदान लाभले आहे।
आपल्या मनोगतामध्ये माजी शिवसेना तालुका प्रमुख श्री येताळा भगत सर म्हणाले, कि,पुढील गळीत हंगामातील मोळी पुजन आणि डिस्टीलरी पुजन हा कार्यक्रम एकत्रित व्हावा ही अपेक्षा आहे। निसर्ग अनुकूल असताना चांगले गाळप करणे गरजेचे आहे। या गळीत हंगामामध्ये वाहनधारक खंबीरपणे संचालक मंडळाच्या पाठीशी राहिले। आपला कारखाना आहे या भावनेतून येथील कामगार काम करीत आहेत, त्यामुळे हे कामगार अभिनंदनास पात्र आहेत। तसेच संचालक मंडळानेही कारखाना चांगल्या पध्दतीने चालविलेबध्द्ल अभिनंदन केले।
कारखान्याचे संचालक श्री अशोक केदार आपल्या मनोगतामध्ये म्हणाले कि, प्रत्येक शेतक-यांना वाटते की आपला ऊस लवकर गळीतास जावा, परंतु प्रोग्रùमप्रमाणे ऊस गळीतास आणावा लागतो। अशा वेळी शेती विभागाची कसरत असते। परंतु तरीही शेती विभागाने चांगल्या प्रकारे काम केले आहे। दामाजी कारखान्यातील कामगार हे समजतूदार आहेत। पगार मागेपुढे झाले तरी कामगार संघटनेने सहकार्याची भुमिका ठेवल्यामुळे हंगाम यशस्वी झाला आहे। आजअखेर दामाजी कारखान्याने या हंगामात ३,८५,०६० मे।टन गाळप करुन                    ३,९७,५०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे। सरासरी साखर उतारा १०।३६ टक्के असुन साखर उता-यामध्ये दामाजी कारखाना सोलापूर जिल्हयात दुस-या क्रमांकावर आहे।  कारखान्याचे चेअरमन,मा।आमदार श्री समाधान आवताडे आणि संचालक मंडळाने शेतक-यांना योग्य भाव दिला आहे। प्रत्येक वर्षाला सभासदांना प्रति किलो रु।१० प्रमाणे साखर देण्याचा शब्द या संचालक मंडळाने पाळला आहे।  आपणां सर्वांच्या आशिर्वादाने चेअरमन श्री समाधान आवताडे हे आज आमदार झाले आहेत। असेच सहकार्य यापुढेही रहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली।
कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे सभापती श्री।सुधाकर मासाळ, माजी सभापती श्री।प्रदिप खांडेकर, कारखान्याचे संचालक श्री लक्ष्मण जगताप, श्री राजीव बाबर,श्री।राजेंद्र पाटील, श्री सुरेश भाकरे, श्री अशोक केदार, लक्ष्मण नरुटे,यांचेसह श्री भारत निकम, रहाटेवाडीचे सरपंच श्री गोपाळ पवार, लाडीक डोके, संजय माळी उपस्थित होते।
या कार्यक्रमात ऊस तोडणी वाहतुकीचे विक्रमी काम केलेबध्द्ल ठेकेदार समाधान शिंदे,लक्ष्मण गरंडे, दयानंद गरंडे, दामाजी बंडगर,अशोक शिंदे,तुकाराम लवटे,प्रताप शिंदे,जितेंद्र लेंडवे, तात्यासाो घेाडके, वसंत दोलतडे,योगेश चंदिले, अजिनाथ वारे,दादा सानप, सोमिनाथ सातपुते यांचा यथोचित सत्कार करुन प्रोत्साहनपर बक्षीस देणेत आले। कार्यक्रमासाठी कारखान्याचे वर्क्स मùनेजर श्री गणपत घाडगे, चिफ केमिस्ट श्री मोहन पवार, मुख्य शेती अधिकारी श्री रमेश पवार, कार्यालयीन अधिक्षक श्री दगडू फटे, सिव्हील इंजिनिअर श्री प्रविण मोरे, स्टोअर किपर श्री उत्तम भूसे, परचेस आùफिसर श्री येताळा सावंजी, असि।गोडावून किपर श्री विश्वास पवार, लेबर आॅफिसर श्री आप्पासोा शिनगारे, केनयार्ड सुपरवायझर श्री प्रकाश पाटील, सुरक्षा अधिकारी श्री लक्ष्मण बेदरे, इडीपी मùनेजर मनोज चेळेकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री विठ्ठल गायकवाड, पदाधिकारी, पतसंस्थेचे अध्यक्ष श्री विश्वास सावंजी, पदाधिकारी, कर्मचारी, सभासद,शेतकरी,ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार,सिझन कंत्राटी ठेकेदार उपस्थित होते। कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री अशोक उन्हाळे यांनी केले।

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here