दामाजी कारखाना कार्यस्थळावर संस्थापक व्हा. चेअरमन स्व. रतनचंद शहा शेठजी यांची १०२ वी जयंती साजरी.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक व्हा. चेअरमन स्व. रतनचंद शहा शेठजी यांची १०२ वी जयंती कारखाना कार्यस्थळावर साजरी करण्यात आली.  याप्रसंगी स्व।रतनचंद शहा शेठजी यांच्या पूर्णाकृती पुतळयास मार्केट मेटीचे सभापती सोमनाथ आवताडे यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.  याप्रसंगी दामाजी कारखान्याचे संचालक श्री लक्ष्मण जगताप, श्री सुरेश भाकरे, तसेच श्री भारत निकम, प्र।कार्यकारी संचालक श्री रमेश गणेशकर, श्री विजय बुरकूल, श्री बाबा कोंडूभैरी, श्री दिगंबर यादव, उपस्थित होते. सदर प्रसंगी वर्क्स मॅनेजर श्री गणपत घाडगे, चिफ केमिस्ट श्री मोहन पवार, सिव्हील इंजिनिअर श्री प्रविण मोरे, स्टोअर किपर श्री उत्तम भुसे, केनयार्ड सुपरवायझर श्री प्रकाश पाटील, सुरक्षा अधिकारी श्री लक्ष्मण बेदरे, श्री प्रकाश रोहिटे, अधिकारी, खातेप्रमुख, विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here