दगडफेक केलेल्या अज्ञात आरोपी विरोधात कडक, बार्शी-पोलिसांनी त्वरित कारवाई करावी! (अन्यथा जिल्हा पोलीस प्रमुखांच्या समोर आत्मदहन आंदोलन करणार:इब्राहिम शेख)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम शेख यांच्या राहत्या घरावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दगड फेक केली असल्याची घटना समोर येत आहे.

यामध्ये सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम शेख यांचे वडिल घरामध्ये झोपले असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तिने घरावर दगड टाकून पत्रा शेडचे मोठ्या नुकसान केले आहे. यावेळी भा द वी ४२७ प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद बार्शी पोलिस ठाण्यात केला आहे.

या सर्व घटनेची नोंद बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आले असून यामध्ये बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मांजरे साहेब यांनी तपासाला दिरंगाई केला असल्याचा गंभीर आरोप यावेळी बार्शी येथील सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम शेख यांनी केला असून अशा जर सर्वसामान्य असणाऱ्या उपस्थितीने गरीब असणाऱ्या जर सामाजिक कार्यकर्त्यावर दाशा प्रकारचे गंभीर हल्ले होत असतील व त्यांच्या जर घरादारावर दगडफेक होत असेल तर आम्ही काम कसे करायचे. असा प्रश्न यावेळी सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.

बार्शी शहर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून या गुन्हेगारांना फक्त राजकीय अभय मिळत असून या सर्व आरोपींना कोणीतरी पाठीशी घालत आहे असाही आरोप यावेळी सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम शेख यांनी केला.
दोन नंबर व्यवसाय करून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची लूट करणाऱ्या अशा गुन्हेगारांना जर वेळीस जेरबंद केले नाही तर व त्यांचा बंदोबस्त नाही केला तर सोलापूर येथील जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम शेख व त्यांच्या सर्व मित्र परिवाराने दिला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here