“त्या” पदाधिकार्‍यांवर कारवाईची केली मागणी!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

दस्तलेखनिक साळुंखे यांचे एकदिवशीय निषेध आंदोलन

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा तसेच रिपाईच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनात, आपणास अरेतुरेची भाषा वापरली आहे. आपल्या स्वाभिमानास ढेच पोहोचवण्याचे काम केले आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी येत्या ७ मार्च रोजी, पंढरपूर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती, दस्तलेखनिक सुधीर साळुंखे(महाराज) यांनी दिली आहे. या संदर्भातील निवेदन पंढरपूर तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्याकडे देण्यात आले आहे.

 

२८ फेब्रुवारी रोजी भाजपा किसान मोर्चा तसेच रिपाईच्या वतीने हलगी नाद आंदोलन करण्यात आले. पंढरपूर तहसील कार्यालयासमोर पार पडलेल्या या आंदोलनात, माऊली हळणवर आणि दीपक चंदनशिवे यांच्याकडून काही आक्षेपार्ह चुका झाल्या असल्याची तक्रार सुधीर साळुंखे यांच्याकडून करण्यात आली आहे. हे आंदोलन सुधीर साळुंखे यांचा परवाना आणि जागेबाबत होते. मात्र या दोन्ही मुद्द्यांबाबत खातरजमा करण्यात आली नाही, तसेच हे आंदोलन वैयक्तिक पातळीवर पोहोचल्याची तक्रार साळुंखे यांनी केली आहे.

आपण गेल्या वीस वर्षापासून दस्तलेखनिक आहे. सहाजिकच गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत अनेक नागरिकांचा सहवास दररोजच लाभत असतो. याशिवाय आपणास पहिल्यापासूनच अध्यात्माची ओढ आहे. यानिमित्ताने परमार्थावर नेहमीच चिंतन होत असते. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा पगडा माझ्यावर कायमचं होता व आहे. माझ्या बोलण्याची आणि वागण्याची पद्धत पाहून , समाज मला आपुलकीने महाराज असे संबोधतो. माझ्या विरोधात झालेल्या आंदोलनात कोणत्याही कागदपत्रांची खातरजमा करण्यात आली नाही. याशिवाय वैयक्तिक पातळीवर अरेतुरेची भाषा वापरण्यात आली. हा कसला महाराज ? हा तर भोंदूगिरी करतो …समाजाला लुटतो… असे संबोधण्यात आले .प्रत्येकास वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्यानुसार प्रत्येकजण आपले जीवन व्यतीत करत असतो. याच स्वातंत्र्याची गळचेपी संबंधित आंदोलकांनी केली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सुधीर साळुंखे यांनी केली आहे.

या मागणीसाठी येत्या ७ मार्च रोजी, पंढरपूर तहसील समोर एक दिवसीय निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.याबाबत त्यांनी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी सोलापूर, पोलीस अधिक्षक सोलापुर, उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर, विभागीय अधिकारी पंढरपूर तसेच पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांना कळवण्यात आले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here