“त्या” आंदोलनास तुर्तास स्थगिती!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

“त्या” आंदोलनास तुर्तास स्थगिती

कारखान्यांनी ऊस बीले नाही दिले तर उग्रस्वरूपाचे आंदोलन छेडणार: ज्ञानेश्वर (माऊली) जवळेकर

 

पंढरपुर तालूक्यातील साखर कारखान्याने शेतक-यांची मागील ऊस बीले व कामगारांचे पगार अद्यापही दिले नाहीत त्याच अनुषंगाने बळीराजा शेतकरी संघटनेने दि.16 रोजी धरणे आंदोलन पुकारले होते याप्रसंगी तहसिलदार व नायब तहसिलदार सर्व कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्याशी चर्चा करुन व लेखी ठोस आश्वासन घेऊन त्या आंदोलनास तुर्तास स्थगिती दिली आहे.

तालूक्यातील सर्व कारखान्याच्या कार्यकारी संचलकां समवेत बैठक आयोजित केली होती या बैठकीत विठ्ठल सह.साखर कारखाना,सहकार शिरोमणी साखर कारखाना व सिताराम साखर कारखाना यांनी आंदोलनकर्ते बळीराजा संघटनेस ठोस लेखी पत्र दिले असून सदरील ऊस बीले व पुर्ण एफ आर पी रक्कम व कामगारांच्या पगारी येत्या पंधरा ते वीस दिवसात देऊ असे आश्वासन कारखान्यांनी दिले आहे जर दिलेल्या कालावधीत कारखान्यांनी ऊस बीले नाही दिले तर उग्रस्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर यांनी दिला.

यावेळी बळीराजाचे नितीन बागल, सर्जेराव शेळके,शेखर कोरके,रमेश भोसले,दामाजी मोरे,कीसान युवा क्रांतीचे प्रतापसिंह चंदनकर, रामेश्वर झांबरे,रमेश लंगोटे, शेतकरी रामदास खराडे,उत्तम महाडिक,तानाजी खराडे,विकास खराडे,औदुंबर सुतार,तानाजी सोनवले,मारूती कोळशे,सचिन जवळेकर,सुरज भांगे,विष्णू भोसले,प्रवीण नाईकनवरे, नितीन गावडे,अनिल शिंदे व शेतकरी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here