तिन वाहनांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत ट्रक चालक गंभीर जखमी जगापूर पाटी येथील घटना.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

तिन वाहनांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत ट्रक चालक गंभीर जखमी
जगापूर पाटी येथील घटना.

 

बरडशेवाळा ता.25 नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या अर्धवट अवस्थेत असलेल्या कामाने एकाच बाजूने चालु असलेली वाहतुकीत भरधाव वेगाने सुरू असलेल्या वाहतुकीने अपघाताची मालीका सुरुच असुन पंचेवीस रोजी सकाळी सकाळी चार च्या सुमारास नांदेड हुन वर्धा कडे जाणारा मालवाहतूक ट्रक क्रमांक MH26.0543 हदगाव कडे जात असताना खाजगी ट्रॅव्हल्स क्रमांक MH4.0349 पाठीमागून येणारी बोलेरो MH.27.2333 ट्रॅव्हल्स ला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणारा ट्रक समोरासमोर धडकल्याने तिहेरी झालेल्या अपघातात ट्रक चालक हरी पाईकराव वय 48 वर्षे गंभीर जखमी झाला आहे. तर तिन्ही वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. अपघाताची माहिती मनाठा पोलीस स्टेशनला मिळताच सपोनि विनोद चव्हाण हे सहकार्यासोबत घटनास्थळ गाठुन ट्रकच्या स्ट्रेरींग मध्ये अडकलेल्या चालकांना बाहेर काढून ॲम्बुलन्स बोलावून उपचारासाठी नांदेड येथे पाठविले आहे . या घटनेचा पुढील तपास मनाठा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक टि.यु चिट्टेवार करीत आहेत.यावेळी बीट जमादार पवार कॉन्स्टेबल आनंद वाघमारे नरवाडे उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here