तर वीज कशी चालु करायची ते आम्हाला चांगले माहीत आहे- रणजितसिंह शिंदे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापुर जिल्हा प्रतिनीधी

कन्हेरगाव : -शासनाने आवाहन केल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी दोन-दोन वेळी बिले भरली तरीही वीज कनेक्शन कट केली आहेत.आत्ता शेतकऱ्यांच्या भावनेचा आदर करून वीजबिल दुरुस्ती करून,हप्ते पडून द्यावेत.जर वीज मंडळाची सहकार्याची भूमिका नसेलतर आम्हाला वीज कशी सुरू करायची हेही माहीत आहे अशा शब्दात जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे वीज मंडळास फटकारले.दोन दिवसांपूर्वी जि.प.चे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज मंडळाच्या कार्यालयास टाळे ठोको आंदोलन झाले होते.यावेळी संजय पाटील यांनी दोन दिवसात वीज सूरु करा अन्यथा हलगी मोर्चा काढण्याचा अल्टीमेटम दिला होता.त्यानुसार शनिवारी सकाळी वीज मंडळावर जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे व संजय पाटील-भिमानगरकर यांच्या नेतृत्वाखाली हालगी मोर्चा काढण्यात आला होता व धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी रणजितसिंह शिंदे बोलत होते.पुढे बोलताना रणजितसिंह शिंदे म्हणाले की,वीज मंडळाने व्यवहार्य तोडगा काढावा. अडवणूक खपवून घेणार नाही.एच.पी.प्रमाणे बिले दुरुस्ती करून घ्यावीत तरच शेतकरी सुध्दा सहकार्य करतील.
संजय पाटील-भिमानगरकर बोलताना म्हणाले की,दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे शेतमालाला भाव मिळाला नाही.दर महिन्याला वीज कनेक्शन कट करता हे आता खपवून घेणार नाही आक्रमकपणे सुनावले.तुमची दादागिरी बंद करा असा इशारा दिला.आता शेतकऱ्यांची सामंजस्याची भूमिका संपली आहे.शेतकऱ्यांचा अंत पाहू नका असे म्हणत त्यांनी वीज सुरू झाल्याशिवाय उठणार नाही अशी भूमिका ठाम घेतली.
शेतात पोल दिसू देणार नाही असे ठणकावले.
माजी उपसभापती बंडूनाना ढवळे यांनी सांगितले की,आमची एकच भूमिका आहे,आमची वीज जोडली पाहिजे.पैसे भरून वीज जोडत नाही.यामुळे तुमच्यावर ३५३ कलमाखाली गुन्हा दाखल केला पाहिजे.कायदा सर्वांना सारखा आहे.शेतकऱ्यांचा हक्क हिरावून घेत असेल तर गप्प बसणार नाही.गेल्याच महिन्यात पैसे भरले,सारखेसारखे पैसे कोठून आणणार असा प्रश्न केला.
यावेळी जिल्हा परिषद प्रतिनिधी शिवाजी पाटील,धनंजय मोरे,अशोक खटके,रामभाऊ शिंदे यांची भाषणे झाली.
वीज मंडळाच्या वतीने उपकार्यकारी अभियंता जाधव यांनी वीज सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने धरणे आंदोलन थांबविण्यात आले.

यावेळी माजी उपसभापती बंडूनाना ढवळे,उपसभापती धनाजी जवळगे,रावसाहेब देशमुख,रमेश पाटील,वेताळा जाधव,प्रमोद कुटे,संभाजी पाटील,पोपट चव्हाण,सचिन लोंढे,सोमनाथ कदम,वैभव कुटे,दीपक पाटील,रामभाऊ पाटील,राजेंद्र पाटील,हरिदास पाटील यांच्यासह मान्यवर,गावोगावचे शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here