डॉ.धवलसिंह मोहिते – पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त व महिला दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय खेळाडू त्याच्या मातोश्री व पत्रकार बांधवांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते – पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त व जागतीक महिला दिना निमित्त सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतिने बुधवार दिनांक ९ मार्च रोजी काँग्रेस भवन सोलापूर येथे माजी आमदार श्रीमती निर्मलाताई ठोकळ व सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय खेळाडू ,त्यांच्या मातोश्री व पत्रकार बांधवांचा फेटा बांधून ,सन्मान चिन्ह व बुके देउन सत्कार करण्यात आले .

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार श्रीमती निर्मलाताई ठोकळ, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले, माजी महापौर अलकाताई राठोड , शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कु.हेमाताई चिंचोळकर ,प्रदेश काँग्रेस ओ.बी.सी.विभागाचे उपाध्यक्ष सुधिर लांडे,जिल्हा संघटक रमेश हसापूरे ,जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मल्लेशी बिडवे,जिल्हा सरचिटणीस तथा संयोजक भिमराव बाळगे,तालुका अध्यक्ष हरिष पाटील,उपाध्यक्ष अशोक देवकते,मोतीराम चव्हाण ,जनसेवा संघटना उपाध्यक्ष अभिराज शिंदे,प्रमिलाताई तुपलवंडे ,माजी तालुका अध्यक्ष लक्ष्मण भोसले ,जिल्हा सरचिटणीस सुदर्शन अवताडे,व्यवहारे गुरुजी ,सागर सोलापूरे,नागनाथ बंगाळे,सुर्यकांत व्हनकडे ,दतात्रय गजबार विनोद रणसुरे आदि.उपस्थित होते.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना माजी आमदार निर्मलाताई ठोकळ म्हणाल्या डॉ.धवलसिंह अध्यक्ष झाल्या पासुन काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे.त्याच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष उभारी घेत आहे.ते आल्या पासुन कार्यक्रमाचा धडाका सुरु झाला आहे .
शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले आपल्या मार्गदर्शनात म्हणाले पत्रकार , खेळाडू व त्याच्या माता यांचा सन्मान हे काँग्रेस पक्षा नेहमी करित आला आहे .काँग्रेस पक्ष वेळोवेळी असे कार्यक्रम रबवुन ज्यांचा त्याचा सन्मान करित आहे. काँग्रेसने अनेक महिलांनाविविध पदावर संधी दिली आहे. *यावेळी माजी महापौर अलकाताई राठोड ,शहर महिला काँग्रेस अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर ,जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मल्लेशी बिडवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रमुख पाहुण्यांचे स्वागत इक्बाल शेख,मनोज बाळगे,सुरेश सोनवणे ,जिशानआली जहागीरदार ,कपिल वाघमारे, फुलचंद जावळे आदिनी स्वागत केले. सदरील कार्यक्रमास सोलापूर शहर व जिल्ह्यातून २०० खेळाडू व त्याच्या मातोश्री व सर्व दैनिकांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सुदर्शन आवताडे यांनी केले .व अभार जिल्हा उपाध्यक्ष रशिद शेख यानी मानले .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here