डॉक्टर डे च्या निमित्ताने इनरव्हिल क्लब ऑफ पल्स पंढरपूर यांच्या वतीने.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

डॉक्टर डे च्या निमित्ताने इनरव्हिल क्लब ऑफ पल्स पंढरपूर यांच्या वतीने.

जनकल्याण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील डॉक्टरांना कोरोना योध्दा म्हणून सर्टिफिकेट देवून सत्कार संपन्न.

 

पंढरपूर // प्रतिनिधी 

डॉक्टर डे च्या निमित्ताने इनरव्हिल क्लब ऑफ पल्स पंढरपूर यांच्या वतीने पंढरपूर मधील पहिले कोवीड सेंटर जनकल्याण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील डॉक्टर डॉ.अजित जाधव,डॉ.विशाल फडे, डॉ.आनंद कुलकर्णी, डॉ.अनिल काळे, डॉ अमृता म्हेत्रे,डॉ.श्रेया जाधव, डॉ.काजल जरे, डॉ.संग्राम किलमिसे, डॉ.दिनेश चौगेले व नर्सिंग स्टाफ  यांना कोरोना योध्दा म्हणून सर्टिफिकेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच इनरव्हिलबच्या चार्टर अध्यक्षा सौ.सायली लाड यांचाही वसंतदादा काळे मेडीकल फाउंडेशनच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आहे.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ.संगिता काळे, डॉ.जयश्री शिनगारे, जनकल्याण हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुधीर शिनगारे, इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा सारीका कासार,डॉ.सायली लाड,खजिनदार गौरी गोसावी,नीलीमा गोसावी, नीलीमा शिंदे,स्वाती भगरे, पल्लवी उपाध्ये, जनकल्याण हॉस्पिटलचे व्यवस्थापक सददाम मणेरी, आण्णासो डुबल, डॉ.सत्यवान बागल, उपस्थित होते.

यावेळी डॉ. सुधीर शिनगारे यांनी वसंतदादा काळे यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा दिला.  दादांच्या विचारांचा वारसा संस्थेचे मार्गदर्शक सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालवित आहोत. कोरोना आजाराचा प्रार्दुभाव सर्वत्र असताना पहिल्या लाटेत पंढरपूर ग्रामीण व शहरातील  कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेवून कोरोना रुग्णांसाठी पहिल्यांदा जनकल्याण हॉस्पिटलने सेवा सुरु करुन सर्वसामान्य रुग्णांना आधार देण्याचे काम संस्थेचे मार्गदर्शक कल्याणराव काळे साहेब यांनी केले असल्याचे सांगीतले. जनकल्याण हॉस्पिटलच्या माध्यमातून  गरीब गरजु रुग्णांनाकरीता अल्प दरात चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा देण्यात येते तसेच विविध शासकीय योजनेमधून रुग्णांवर उपचार करण्यात येते आहेत. कोवीड हॉस्पिटल मध्ये कार्यरत असणारे डॉक्टर, नर्सिंग व इतर स्टाफ, यांनी रुग्णांची अत्यंत चांगल्या प्रकारे सेवा देण्याचे काम केलेले असल्याचे याप्रसंगी जनकलयाण हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधीर शिनगारे यांनी सांगीतले.

इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा सौ.सारीका कासार यांनी संस्था व जनकल्याण हॉस्पिटलने आज पर्यंत केलेल्या आरोग्य विषयक उपक्रमाची प्रशंसा केली. कोरोना काळामध्ये हॉस्पिटलमधील सर्व स्टाफने रुग्णांची सेवा केल्याबद्रदल त्यांनी आभार मानले.  अशा प्रकारच्या आरोग्य विषयक उपक्रमांना सहकार्य करण्याचे त्यांनी अभिवचन दिले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आबासाहेब देशमुख तर उपस्थितांचे आभार डॉ.श्रेया जाधव यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here