ट.सिकंदर येथे पारंपरिक पद्धतीने शिवजयंती उत्साहात साजरी! (मुंबई येथील हिंदवी स्वराज्य ढोल ताशा पथकाची नेत्रदीपक कामगिरी) (सर्व ग्रामस्थांचे घेतले लक्ष वेधून)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे आज शिवजयंती (परंपरेने)ढोल-ताशाच्या गजराज साजरी करण्यात आली सर्वधर्मसमभाव बंधू भगिनी एकत्रित येऊन पारंपरिक पद्धतीने शिवजयंती उत्साहात साजरी केली यावेळी मुंबई डोंबिवली येथील हिंदवी स्वराज्य ढोल-ताशा पथकाने अत्यंत नेत्रदीपक कामगिरी केली असून या ढोल ताशा पथकाच्या कामगिरीमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये टाकळी सिकंदर या गावाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे

दर वर्षी होणाऱ्या विनाकारण खर्चाला फाटा देत संपूर्ण तालुक्याचे, आबालवृद्धांचे लक्ष केंद्रित करून,एक मनमोहक व मनोरंजनात्मक ढोल व ताशा पथकाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले सर्वांना गावकऱ्यांनी मौलाची साथ दिली आहे.

या भव्य मिरवणुकीचे नियोजन टाकळी सिकंदर मधील शिवप्रेमी तरूण मंडळाने केले असून यामध्ये गावातील सर्वच नेतेमंडळींनी तरुण मंडळाला सहकार्य केले यामध्ये प्रामुख्याने भीमा लोकनेते पांडुरंग परिवार व सर्व ग्रामस्थांनी या सर्व मिरवणुका सुनियोजित पद्धतीत काढून तालुक्यामध्ये आदर्श घालून दिला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here