टाकळी चौकातील अतिक्रमण लवकरात लवकर न हटविल्यास दि 20 रोजी रस्ता रोको आंदोलन करणार! (पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने देण्यात आला इशारा)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती मुख्य चौकामध्ये, सार्वजनिक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व इतर सर्व सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी सर्व समाजातील जाती धर्मातील लोकांनी पूर्वीपासूनच १९९८ सालापासून झेंड्याचा एक कट्टा व ध्वज तयार करण्यात आला होता. त्या अनुषंगाने या कट्ट्याच्या जवळ, गावातील काही समाजकंटकांनी पत्रा शेड चिटकवून मारण्यात आलेला आहे त्यामुळे सदरच्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास अडचण निर्माण झालेले आहे व सर्व भीम सैनिकांची मने यामुळे दुखावले आहेत. सदर पत्रा शेड काढून न घेतल्यास पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून आम्ही दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी ठीक १० वाजता, भव्य असा रास्ता रोको आंदोलन घेण्यात येईल असा इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष कृष्णाजी गायकवाड यांनी एका निवेदनाद्वारे मोहोळ तहसीलदार व मोहोळ तालुका पोलीस स्टेशन यांना दिले आहे.
दोनच दिवसांपूर्वी कृष्णाजी गायकवाड यांनी मोहोळ तालुका पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अशोक सायकर साहेब, यांना एका निवेदनाद्वारे ही सर्व माहिती दिली होती पण सदरच्या व्यक्तीने तो पत्रा शेड काढून घेण्यास साफ नकार दिल्यामुळे पुरोगामी संघर्ष परिषद संपूर्ण मोहोळ तालुका व समविचारी संघटना यांनी पुन्हा एकदा मोहोळ पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना निवेदनाद्वारे माहिती सादर केली आहे.
सदरचे अतिक्रमण लवकरात लवकर काढण्यात यावे अशी या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली असून ही मागणी जर पूर्ण नाही झाल्यास आम्ही रस्ता रोको करण्यावर ठाम असल्याची यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे जिल्हाध्यक्ष कृष्णाजी वसंत गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीसी बोलताना सांगितले.
तरी सदरील निवेदनावर पुरोगामी संघर्ष परिषदेच्या जिल्हाध्यक्ष कृष्णाजी गायकवाड, अशोक गायकवाड, भारत कदम, बाळासाहेब सोनटक्के, दीपक फडतरे, सुनील कदम, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

चौकट-
ज्या संबंधित व्यक्तीने हे अतिक्रमण केले आहे त्याला याच्यापूर्वी आम्ही बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनला जाऊन समज दिली होती पण तो ऐकण्याच्या मनात येत नसल्यामुळे आम्ही आता रस्ता रोको आंदोलन करणार आहोत.
जिल्हाध्यक्ष
कृष्णाजी गायकवाड

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here