जैनवाडी ग्रामपंचायतीचा कोवीड लसीकरणाचा अभिनव उपक्रम

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

जैनवाडी ग्रामपंचायतीचा कोवीड लसीकरणाचा अभिनव उपक्रम

 

जैनवाडी गावातील ग्रामस्थांना गावांमध्येच सशुल्क लसीकरणाच्या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात आज करण्यात आली. ॲड.श्री.दीपक दामोदर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत जैनवाडी ने गावामध्येच डॉक्टर नाथाजी केसकर यांच्या द्वारका हॉस्पिटल मार्फत लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे.अशी विधायक संकल्पना अंमलात आणणारे जैनवाडी हे पहिले गाव ठरले आहे.यामुळे ग्रामस्थानचे आरोग्य तर सुरक्षित होईलच त्याबरोबरच शासनावरील ताणही कमी होईल.

शासनामार्फत होणारे अतिशय तुटपुंजे प्रमाणातील लसीकरण त्यानुसार गावातील सर्वांचे लसीकरण व्हायला किमान एक वर्षाचा कालावधी लागेल आणि इतका वेळ गावातील सर्वांचे आरोग्य धोक्यात राहील, यावर तोडगा म्हणून शासनाच्या भरोशावरती न राहता ॲड.श्री दिपक पवार व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व त्यांचे सहकारी यांनी गावातील लोकांचे प्रबोधन करून त्यांच्यासाठी गावांमध्येच सशुल्क लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्याची सुरुवात आज ॲड.दिपक पवार, डॉक्टर नाथाजी केसकर, डॉक्टर मदने, विलास गोफणे, माजी सरपंच हनुमंत सोनवले, मोहन माने, मोतीराम पवार, गणेश जमदाडे, महादेव जमदाडे, गणेश होनमाने, दादा गोफणे, सुहास पवार, गणपत दासरे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जैनवाडी गावांमध्ये करण्यात आली व त्यावेळी जवळपास शंभर लोकांचे लसीकरण करण्यात आले व एका महिन्यामध्ये गावाचे 100% लसीकरण पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

कोरोना चे संकट सर्व जगासमोर ठाण मांडून बसलेले आहे व लसीकरण हा एकमेव पर्याय यातून लोकांना वाचवू शकतो परंतु केंद्र सरकार मार्फत व राज्य सरकार मार्फत अत्यंत धीम्या गतीने लसीकरण सुरू असून लोकसंख्येच्या प्रमाणात गावांना लस उपलब्ध करून दिली जाते परंतु गावची असणारी लोकसंख्या व उपलब्ध होणारी लस यांचे प्रमाण खूपच
व्यस्त आहे. शहरांमध्ये सध्या काही खाजगी दवाखान्या मार्फत सशुल्क लसीकरणाची सोय शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे परंतु ग्रामीण भागामध्ये तशा पद्धतीची व्यवस्था नाही, त्यामुळे लोकांना लसीकरणासाठी ग्रामपंचायतवरच अवलंबून राहावे लागत आहे येणारी तिसरी लाट पाहता जास्तीत जास्त लसीकरण होणे हे अत्यंत गरजेचे आहे ही गोष्ट लक्षात घेऊनच जैनवाडी ग्रामपंचायतीने गावातील लोकांना गावांमध्येच सशुल्क लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here