जि.प.प्राथ.केंद्र शाळा पुळुज येथे मोफत पाठ्यपुस्तके वाटप

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

जि.प.प्राथ.केंद्र शाळा पुळुज येथे मोफत पाठ्यपुस्तके वाटप

सोलापूर // प्रतिनिधी

राज्य शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तके योजनेअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा पुळूज येथे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना गट शिक्षणाधिकारी नाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व विस्तार अधिकारी श्री.लिगाडे साहेब आणि केंद्रप्रमुख श्री.घाडगे साहेब यांच्या प्रेरणेतून मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप सरपंच शिवाजी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले .
यावर्षी शैक्षणिक वर्ष जून महिन्यात सुरू झाले परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अध्यापन प्रक्रिया सुरू आहे शिवाय स्वाध्याय उपक्रम ,आधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करण्यासाठी पाठ्यपुस्तकाची नितांत आवश्यकता असते.दरवर्षी शाळा सुरू होताना पाठ्यपुस्तके शासनाकडून उपलब्ध करून दिली जातात पण यावर्षी शासनाने उशिराने पाठ्यपुस्तके पुरवली आहेत आणि ती सुद्धा उपलब्ध संख्येच्या तुलनेत कमी असल्याने मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रत्यक्ष शाळेत विद्यार्थ्यांना वाटप करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे ,यावर तोडगा म्हणून शिक्षण विभागाने मागील वर्षातील काही जुनी पुस्तके वाटण्याचा सल्ला दिला आहे .शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तक वाटप करण्यात आले यावेळी सरपंच शिवाजी शेंडगे म्हणाले की जो शाळा सुधारण्यासाठी निधीची गरज आहे तो निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देणार अशी ग्वाही दिली. उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पांढरे, अनिल शिंदे ,उमेश होनकळस ,उमाजी पांढरे, जुबेर मुलानी ,अमोल होनकळस , अन्सार मुलानी ,साहेबराव सावंत, मुख्याध्यापक तुकाराम गायकवाड, शिक्षक विठ्ठलराव टाकळे, सागर सोनवले ,सचिन निरगुडे ,विनोद राजमाने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here