जिल्ह्यातील प्रलंबित कामांच्या निधीबाबत एकत्रित प्रस्ताव द्या पालकसचिव दिनेश वाघमारे यांच्या सूचना

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

जिल्ह्यात जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद, महानगरपालिकेने कोरोना काळात महत्वाची भूमिका बजावली आहे. तुमच्या कामामुळे कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे. या कामात सातत्य ठेवा. जिल्ह्यातील प्रलंबित कामांच्या निधीसाठी प्रशासनाने सर्व विभागांचे एकत्रित प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना जिल्ह्याचे पालकसचिव तथा उर्जा विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी दिल्या.

            जिल्हास्तरीय सर्व विभागाच्या ऑनलाईन आढावा बैठकीत श्री. वाघमारे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पोलीस उपायुक्त दिपाली धाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तर महापालिका आयुक्त पि.शिवशंकर आणि इतर अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

श्री. वाघमारे यांनी कोरोना, लसीकरण यासह सर्व विभागाचा आढावा घेतला. कोरोना आणि लसीकरणाबाबत जिल्ह्याचे काम उत्कृष्ठ असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रत्येक विभागाने वेगळा प्रस्ताव सादर करण्याऐवजी विविध विषयांचे एकत्रित प्रस्ताव आले तर मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून जिल्ह्यासाठी निधी उपलब्ध करून देता येईल, असेही त्यांनी सांगितले.

 लसीकरण व्हॅन करा

अमरावती, नागपूर विभागात वृद्ध, दिव्यांग यांना कोरोना लसीकरण करण्यासाठी लसीकरण व्हॅन आहेत. त्या धर्तीवर जिल्ह्यातही अशा लसीकरण व्हॅन तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावर आयुक्त श्री. शिवशंकर यांनी शहरात दोन व्हॅनद्वारे तर ग्रामीण भागात शालेय वाहने आणि इतर वाहनाद्वारे लसीकरण केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. स्वामी यांनी सांगितले.

            जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी सांगितले की, जिल्ह्यासाठी 18 वर्षांवरील 34 लाख 14 हजार 400 नागरिक तर 15 ते 18 वयोगटाचे 2 लाख 26 हजार 412 जणांचे कोरोना लसीकरणासाठी उद्दिष्ठ आहे. यापैकी पहिला डोस 30 लाख 60 हजार 928 नागरिकांनी घेतला आहे. दुसरा डोस 20 लाख 93 हजार 148 नागरिकांनी घेतला आहे. सरपंचांना नोटीसा, दोन डोस असल्याशिवाय पेट्रोल आणि सरकारी कार्यालयात प्रवेशावर बंदी आणि 20 कोटींचा दंड वसूल केल्याने लसीकरणात भर पडली आहे. येणाऱ्या 10 दिवसात 15 ते 18 वयोगटातील युवकांचे लसीकरण पूर्ण होईल. ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण झाला आहे. मागणीपेक्षा तीनपट 334 मेट्रीक टन ऑक्सिजनची क्षमता निर्माण केल्याचेही त्यांनी सांगितले.

 श्री. शिवशंकर म्हणाले, शहरातील सर्व दुकानदार, कामगारांना दोन डोस बंधनकारक केले.

            डॉ. ढेले यांनी सांगितले की, सेक्स वर्कर, एचआयव्ही बाधित आणि इतरांना त्यांच्या परिसरात जाऊन लसीकरण करून घेतले.

             श्री. स्वामी यांनी कोरोना काळात आरोग्य विभागात कंत्राटी काम केलेल्यांच्या मानधनासाठी 52 लाख निधी, श्रीमती धाटे यांनी पोलीस क्वार्टर दुरूस्तीसाठी निधी, डॉ. ढेले यांनी ग्रामीण रूग्णालय आणि उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here