जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी ‘भीमाचे’ संचालक सुनील (दादा) चव्हाण यांची नियुक्ती! सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपच्या माध्यमातून प्रयत्न करणार:सुनिल (दादा) चव्हाण भाजपकडून जिल्हा नियोजन समितीमध्ये अनेकांना संधी!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी ‘भीमाचे’ संचालक सुनील (दादा) चव्हाण यांची नियुक्ती!

सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपच्या माध्यमातून प्रयत्न करणार:सुनिल (दादा) चव्हाण

भाजपकडून जिल्हा नियोजन समितीमध्ये अनेकांना संधी!

भारतीय जनता पार्टीने सोलापूर जिल्ह्यातील आपल्या सर्व पदाधिकारी व समर्थकांना आनंदाची बातमी देत काल जिल्हा नियोजन समिती या निवडी जाहीर केल्या यामध्ये प्रामुख्याने मोहोळ तालुक्यासाठी खा.धनंजय महाडिक गटाचे व भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा भीमाचे संचालक सुनील (दादा) चव्हाण यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी वर्णी लागली आहे.

यामध्ये अक्कलकोट नगरीचे आमदार सचिन (दादा) कल्याणशेट्टी, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार समाधान (दादा) आवताडे,पंढरपुरचे माजी आमदार प्रशांत परिचारक,   याचबरोबर सांगोल्याचे आमदार शहाजी (बापू) पाटील यांचे समर्थक रफिक नदाफ, पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवाजीराव सावंत सर, माळशिरस तालुक्यातून पक्षाला अजून बळकटी मिळण्यासाठी धैर्यशील मोहिते -पाटील, करमाळा तालुक्यातील गणेश चिवटे, माढा तालुक्यातुन योगेश बोबडे, केशवराव पाटील (माळशिरस) आमदार समाधान आवताडे गटाचे पंचायत समिती सदस्य प्रदीप खांडेकर सर, उमेश गायकवाड (सोलापूर), करमाळ्याचे नारायण पाटील, चनगोंडा हावनाळे (ब्रदर, ता. दक्षिण सोलापूर), चेतनसिंह केदार (सांगोला भाजप), गणेश चिवटे (करमाळा शिंदे गट), योगेश बोबडे (टेंभुर्णी, ता. माढा), केशवराव पाटील (निमगाव, ता. माळशिरस), सुनील चव्हाण (खा. धनंजय महाडिक गट टाकळी सिकंदर, ता. मोहोळ), प्रदीप खांडेकर (भाजप, हिवरगाव, ता. मंगळवेढा), रफिक नदाफ (सांगोला), उमेश गायकवाड (सलगरवाडी सोलापूर), विजय गरड (पांगरी, ता. बार्शी), नारायण पाटील (जेऊर, ता. करमाळा, शिंदे गट), अमोल शिंदे (उत्तर कसबा, सोलापूर शिंदे गट), नागेश भोगडे(उत्तर कसबा, सोलापूर), अशोक दुस्सा (न्यू,पाच्छापेठ, सोलापूर) यांची निवड करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस सरकारने सोलापूर जिल्हा नियोजन समिती नव्याने गठीत केली आहे. या समितीत भाजप आणि शिंदे गटाच्या नेते असलेल्या २० सदस्यांच्या समावेश आहे. नव्या समितीमुळे नियोजन समितीच्या निधी खर्चास आता गती येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय आज (ता. १० जानेवारी) उपसचिव संजीव धुरी यांच्या सहीने पारित करण्यात आला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या बरखास्तीनंतर नव्याने स्थापन झालेल्या सरकारला सहा महिन्यानंतर नियोजन समितीच्या सदस्य निवडीस मुहूर्त मिळाला. नवीन सदस्यांमध्ये विधानमंडळ सदस्यांमधून आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार समाधान आवताडे (दोघेही भाजप) यांना संधी देण्यात आली आहे. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यांनी शिंदे-फडणवीस सरकारसाठी या निवडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here