जागतिक युवा कौशल्य दिनानिमीत्त मोफत सेमिनार व कार्यशाळेचे आयोजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर, दि. 12 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता, आणि नाविन्यता विभाग सोलापूर आणि सॅन ए. आय. अॅड मेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमीटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधुन एक दिवसीय रोबोटीक्स अँड आर्टीफिशीयल इंटिलीजन्स या विषयावर मोफत सेमीनार व कार्यशाळा शुक्रवार दिनांक 15 जुलै 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता, सॅन ए. आय. अॅड मेकॅट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमीटेड, डफरीन चौक, स्टेट बॅक ऑफ इंडियाच्यावर, रेल्वे लाईन्स, सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे.

या कार्यशाळेमध्ये तज्ञ मार्गदर्शक यांचेमार्फत आर्टीफिशीयल इंटिलीजन्स टिचिगं किट, एआय स्टार्टर, डोबोट मॅजिशियन लाईट, मुझ टू प्लस, स्लायडींग रेल किट, कन्वेयर बेल्ट किट, रोबोटीक्स, कोडींग, ईमेज रिकगनिशन, व्हिजन किट याबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच रोबोटीक्सचे प्रात्यक्षिक यावर भर दिला जाणार आहे.

तरी इच्छुक 16 वर्षे व पुढील विद्यार्थी उमेदवार, नवउद्योजक, शैक्षणिक / व्यवसाय प्रशिक्षण संस्था व स्टार्टअप यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव यांच्याकडून करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 7768801234.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here