जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर वन विभाग सोलापूर, माहिती व प्रसार मंत्रालय भारत सरकार, सोलापूर महानगरपालिका सोलापूर, आणि वाईल्डलाईफ कॉझर्वेशन असोसिएशन सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 5 जून 2022 रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सिध्देश्वर वनविहार सोलापूर येथे खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणे:-

सकाळी 6  ते 7 या वेळेत पक्षी निरीक्षण कार्यक्रम संयोजक वाईल्डलाईफ कॉझर्वेशन असोशिएशन सोलापूर, युगंधर फाऊंडेश, इको फ्रेंडली कल्ब सोलापूर तर सकाळी 7 ते 8 या वेळेत सीड बॉल (बीज गोळे) तयार करणेची कार्यशाळा श्री संजय तानाजी भोईटे सामाजिक वनीकरण सोलापूर व शेवटी 8 ते 9 या वेळेत वृक्षारोपन व वृक्षलागवड कार्यशाळा तसेच कृषी तज्ञ यांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन सोलापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here