जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटी ६५ लाख रुपये निधी मंजूर – आ. समाधान आवताडे 

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांना जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटी ६५ लाख इतका निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. निधी मंजूर झालेल्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना अधिक स्वरूपात सुलभ आणि विस्तारित करण्याच्या अनुषंगाने हा निधी मार्गी लागणार आहे. या योजनेअंतर्गत मंजूर निधीच्या माध्यमातून गावामध्ये पाणीटाकी उभी करणे, पाण्याचे व्यवस्थापन होण्यासाठी घरोघरी पाणीनळ बांधणे आदी पाणीपुरवठा साधने विकसित करण्यासाठी हा निधी अतिशय महत्वपूर्ण आहे. पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून आ. आवताडे हे विराजमान झाल्यापासून त्यांनी आरोग्य, रस्ते व पाणी या बाबींवर विशेष लक्ष केंद्रीत करून विविध मार्गांनी शासनदरबारी असणारा निधी मतदारसंघामध्ये खेचून आणला आहे. ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जल जीवन मिशन ही योजना अत्यंत आवश्यक आहे. जनतेची नेमकी हिच गरज ओळखून आ. आवताडे यांनी सतत पाणीपुरवठा विभागाकडे आपला राबता ठेवून या भरीव निधीची तरतूद आपल्या पदरात पाडून घेतली आहे.
 जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर निधी व गावांची नावे –
अरळी ४६ लाख ७७ हजार, बोराळे ९२ लाख ६८ हजार, मुंढेवाडी ४२ लाख २२ हजार, रड्डे १ कोटी २८ लाख ८६ हजार, उचेठाण ९६ लाख ६९ हजार, येड्राव १ कोटी १८ लाख ६३ हजार, देगांव ४९ लाख ७२ हजार, धर्मगांव ६१ लाख ६८ हजार, गुंजेगाव १ कोटी ७३ हजार, हुन्नूर १ कोटी २४ लाख ५३ हजार, लवंगी ५७ लाख १९ हजार, लेंडवे चिंचाळे ३० लाख २५ हजार, मानेवाडी ७२ लाख १७ हजार, निंबोणी १ कोटी ५ लाख ७६ हजार, सलगर बु. १ कोटी १९ लाख १७ हजार, सोड्डी ५५ लाख ४१ हजार, तामदर्डी ६३ लाख ४ हजार अशा स्वरूपात निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ता बदल झाल्यापासून शासनाच्या निरनिराळ्या खात्यामार्फत आ. आवताडे यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणल्याने मतदारसंघातील धोरणात्मक विकासाची चक्रे अजून गतिमान होणार असल्याचे चित्र मतदारसंघामध्ये दिसत आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here