जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 39 कोटी 27 लाख रुपये निधी मंजूर – आ.बबनदादा शिंदे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 39 कोटी 27 लाख रुपये निधी मंजूर – आ.बबनदादा शिंदे

जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग संलग्न जल जीवन मिशन अंतर्गत माढा,पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील विविध गावांना नळ पाणी पुरवठा योजनांच्या कार्यवाहीसाठी 39 कोटी 27 लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.

अधिक माहिती देताना आ.शिंदे म्हणाले की, माढा विधानसभा मतदारसंघातील माढा,पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील अनेक गावे ही नळ पाणी पुरवठा योजनेपासून वंचित असून अशा गावांना पाणीपुरवठा सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणेसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करुन सदर योजनेसाठी भरीव निधी मंजूर करुन घेतला आहे. त्यामध्ये माढा मतदारसंघातील 20 गावांचा समावेश असून या गावांना जल जीवन मिशन अतंर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 39 कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने या योजनेत समाविष्ट असलेल्या विविध गावांना आता पाणी पुरवठा योजनेची भैतिक सुविधा उपलब्ध होणार आहे. सदर मंजूर योजनेची कामे लवकरच सुरु होणार असल्याचे सांगितले.

जल जीवन मिशन अंतर्तग नळ पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट झालेली माढा तालुक्यातील गावे व मंजूर निधी –

1) वडशिंगे – रक्कम रु. 93 लाख 29 हजार 704 रुपये , 2) पिंपळनेर – रक्कम रु. 89 लाख 62 हजार 504 रुपये, 3) पालवण – रक्कम रु. 61 लाख 87 हजार 976 रुपये, 4) तांबवे (टें) – रक्कम रु. 1 कोटी 70 लाख 39 हजार 647 रुपये, 5) आढेगांव – रक्कम रु. 1 कोटी 39 लाख 59 हजार 830 रुपये, 6) अरण – रक्कम रु. 1 कोटी 99 लाख 93 हजार 102 रुपये, 7) तुळशी – रक्कम रु. 1 कोटी 56 लाख 01 हजार 352 रुपये, 8) रणदिवेवाडी – रक्कम रु. 63 लाख 37 हजार 234 रुपये, 9) केवड – रक्कम रु. 62 लाख 23 हजार 545 रुपये, 10) चव्हाणवाडी – रक्कम रु. 20 लाख 53 हजार 788 रुपये,

पंढरपूर तालुक्यातील समाविष्ट गावे व मंजूर निधी-

1) भटुंबरे – रक्कम रु. 74 लाख 72 हजार 653 रुपये , 2) व्होळे – रक्कम रु. 1 कोटी 16 लाख 29 हजार 532 रुपये , 3) करोळे – रक्कम रु. 1 कोटी 03 लाख 72 हजार 653 रुपये , 4) पिराची-कुरोली – रक्कम रु. 1 कोटी 99 लाख 07 हजार 017 रुपये , 5) खरातवाडी – रक्कम रु. 55 लाख 99 हजार 989 रुपये ,

माळशिरस तालुक्यातील समाविष्ट गावे व मंजूर निधी-

1) मिरे – रक्कम रु. 1 कोटी 29 लाख 88 हजार 500 रुपये , 2) वाघोली – रक्कम रु.1 कोटी 99 लाख 97 हजार 300 रुपये , 3) वाफेगांव – रक्कम रु. 1 कोटी 38 लाख 06 हजार रुपये , 4) खळवे – रक्कम रु. 7 लाख रुपये ,

जल जीवन मिशन”योजनेअंतर्गत मोडनिंब येथे सुधारित पाणीपुरवठा योजना मंजूर.

 

शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून मोडनिंब साठी 12.75 कोटी रुपयांची सुधारित पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे, त्यामध्ये येवती तलावाच्या आतील बाजूस जॅकवेल बांधणे त्यासाठी वीज कनेक्शनची व्यवस्था करणे 200 एम.एम. व्यासाची येवती ते मोडनिंब जिर्ण झालेली पीव्हीसी पाईपलाईन बदली करून नवीन DIK-9 लोखंडी लाईन टाकणे, जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्त करणे,विद्युत मोटारी बसवणे, ७१ KWp क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली बसवणे, तीन ठिकाणी नवीन उंच टाक्या बांधणे ,गावात आवश्यक ठिकाणी वितरण व्यवस्था तयार करणे, इत्यादी कामे केली जाणार आहेत सौर ऊर्जाप्रणाली मुळे लाईट बिलाची समस्या कमी होणार आहे या योजनेअंतर्गत शक्य तितक्या जास्तीत जास्त वाड्या वस्त्यांना पाणीपुरवठा करता येणार आहे तसेच गावातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे- आ.बबनदादा शिंदे .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here