जप्त वाळू साठ्याचा लिलाव

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर, दि. 01:- मंगळवेढा तालुक्यातील जप्त वाळू साठयाचा लिलाव मंगळवार, दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी  सकाळी ११.०० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित केला असल्याची माहिती प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांनी दिली आहे.

 मंगळवेढा तालुक्यातील मौजे सिध्दापूर येथील प्रस्ताविक संयुक्त वाळू साठ्याच्या लिलावामधील शिल्लक असलेल्या  610.22 ब्रास वाळू साठा किंमत सुमारे  3 लाख 66 हजार 120 रुपये  इतकी आहे. ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी  संबधीत ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी. तसेच लिलावात भाग घेण्यासाठी सोमवार ,दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत  लेखी अर्ज उपविभागीय अधिकारी मंगळवेढा, उपविभाग मंगळवेढा येथे सादर करावेत, असेही उपविभागीय अधिकारी समिंदर यांनी सांगितले.

   सदर लिलावात भाग घेण्यासाठी  25 टक्के रक्कम रोख अथवा डी.डी.व्दारे  भरावी त्याचबरोबर अर्जाचे शुल्क रुपये 2 हजार विनापरतावा भरणे आवश्यक आहे. तसेच सर्वोत्तम बोलीची 25 टक्के रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा करावी.बोलीची उर्वरीत 75 टक्के रक्कम शासकीय खजिन्यात 7 दिवसांच्या आत भरल्यानंतर स्वत:कडील वाहनाव्दारे संबधीत ठिकाणावरुन वाळू घेवून जावी. लिलावात भाग घेण्या-या व्यक्तींनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत तसेच नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी श्री. समिंदर यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here