जकराया शुगरचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ दिमाखात संपन्न! तुम्ही जेवढी जास्त रिकव्हरी देताल तेवढा ऊसास जास्त दर देवु:चेअरमन बिराप्पा जाधव यंदा गळीत हंगामात 8 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ:कार्यकारी संचालक सचिन जाधव

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

वटवटे येथील जकराया शुगर लि.वटवटे कारखान्याचा 12 वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ दिमाखात संपन्न.श्री सत्यनारायण महापूजा श्री .पाराप्पा रामचंद्र पुजा सपत्नीक यांच्या हस्ते संपन्न झाली.

याप्रसंगी जकराया शुगरचे संस्थापक चेअरमन मा.ॲड.बिराप्पा भगवान जाधव , मा.डॉ.अंकुश‌ चोरमूले,पोलीस निरीक्षक मा.अशोक सायकर साहेब , कार्यकारी संचालक मा.सचिन जाधव,मा.राहूल जाधव,प्रा.माऊली जाधव सर यांच्या शुभहस्ते कारखान्याचा बॉयलर पेटवण्यात आला

यावेळी चेअरमन ॲड.बिराप्पा जाधव बोलताना म्हणाले की, ऊस पिकवून तो जोपासने व कारखान्यास गाळपास देणे जशी जबाबदारी शेतकऱ्यांची आहे त्याच प्रमाणे आलेल्या ऊसाचे बिल देणे ही कारखाना प्रशासनाची जबाबदारी आहे शेतकऱ्यांनी सुद्धा ऊस तोडणीसाठी सहकार्य केले पाहिजे तसेच इतर करखाना व शेतकरी यांच्यात जे विश्वासाचे नाते आहे अगदी त्याच प्रमाणे मी सुद्धा हा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही जेवढी जास्त रिकव्हरी देताल तेवढा ऊसास जास्त दर देवु असा विश्वास चेअरमन बिराप्पा जाधव यांनी शेतकऱ्यास दिला.

यावेळी कार्यकारी संचालक मा.सचिन जाधव बोलताना म्हणाले की, गेल्या गळीत हंगामात दोन कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती केली असून यंदा गळीत हंगामात 8 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ आहे.
मागील हंगामापासुन ज्युस ते इथेनॉल अशी वाटचाल सुरू केली त्यामुळे ऊसास चांगला दर देण्यात मदत होईल तरी सर्व शेतकरी सभासदांनी ऊस गाळपास गरबड न करता प्रोग्राम प्रमाणे ऊस गाळपास द्यावा तसेच 105 रू प्रति मे.टना प्रमाणे हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा कले असल्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी सभासद शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

यावेळी मा.डॉ.अंकुश चोरमूले, पोलीस निरीक्षक मा.अशोक सायकर साहेब मा.ॲड. बिराप्पा भगवान जाधव साहेब, कार्यकारी संचालक मा.सचिन जाधव,मा. राहूल जाधव, प्रा.माऊली जाधव सर, सभासद लक्ष्मण माने,रफिक पटेल, डॉ.बाळासाहेब सरवळे, अंकुश भैय्या आवताडे,अरूण घुले,नामदेव गायकवाड, चंद्रकांत सरवळे,अमरदिप जाधव,ज्ञानदेव कदम,जाधव सर,श्रीधर माने बाळासाहेब भोसले, सचिन चौगुले, तसेच जकराया कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी जकराया वाघमारे, मुख्य शेतकरी अधिकारी नानासाहेब बाबर,चिफ इंजिनिअर कुबेरदास कलुबर्मे,चिफ अकाऊंट बजरंग जाधव सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन केन मॉनेजर श्री विजय महाजन यांनी केले कारखान्याचे सर्व अधिकारी,कामगार सर्व शेतकरी सभासद पंचक्रोशीतील वटवटे,एणकी,मिरी,जामगाव बु/खु,इंचगाव,सोहाळे,हराळवाडी,कोरवली,वडापूर,अरबळी,बेगमपूर,अंत्रोळी,वाघोली या गावातून मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here