छत्रपती संभाजीनगर येथील मेळाव्यात असंख्य युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश
सोलापूर // प्रतिनिधी
मनसे मेळावा,मनसे प्रवेश अंतर्गत छत्रपती संभाजीनगर मराठवाडा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांचा येथे मेळावा मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, सरचिटणीस संतोष नागरगोजे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी अनेक युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला,
यावेळी प्रकाश महाजन,राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर,जिल्हा अध्यक्ष सुहास दशरथे,जिल्हा अध्यक्ष दिलीप नाना बनकर, शहर अध्यक्ष सतनामसिंग गुलाटी,जिल्हा संघटक बिपीन नाईक,वैभव मिटकर, राजू जावळीकर ,मंगेश साळवे,गजन गौडा पाटील,आशिष सुरडकर,शेख रशीद,राहुल पाटील,राजू खरे, संकेत शेटे, अशोक पवार, ऍड.नूतन जयस्वाल,लीला राजपूत,सपना ढगे,अनिता लोमटे,पूजा पाटील वाहतूक सेना मनीष जोगदंड आदी सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.