चेअरमन अभिजीत पाटील यांनी बोलवली चंद्रभागेच्या निवडणूकी बाबत विचार विनिमय बैठक!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर तालुक्यात सध्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वातावरण तापत आहे.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागण्याआधी अनेक तर्क वितर्क लावले जात होते परंतु ती आता वेळ संपली कारण सध्या चर्चित असलेले सुप्रसिद्ध उद्योगपती व नुकत्याच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजय संपादन केलेले कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व व्हाईस चेअरमन डॉ.बी.पी.रोंगे सर यांनी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीबाबत विचार विनिमय बैठक बोलावली आहे यामध्ये सर्व उत्पादक शेतकरी सभासद तोडणी वाहतूकदार कर्मचारी,कर्मचारी व परिवारातील सर्व सदस्यांना बोलवण्यात आले आहे. ही विचार विनिमय बैठक दिनांक 03 एप्रिल2023 रोजी दु.3:00 वाजता राष्ट्रमाता जिजाऊ मंगल कार्यालय,इसबावी येथे बोलावली आहे.

सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये डॉक्टर बीपी रोंगे सर यांनी स्वतंत्र पॅनल उभा केले होते त्यावेळेस त्यांना चांगले मताधिक्य मिळाले होते भाळवणी गटात त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या मार्फत नवतरुण युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला तसेच पंढरपूर तालुक्यामध्ये डॉक्टर बीपी रोंगे यांच्या शिक्षण संस्थेचे मोठे जाळे आहे‌.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्या निवडणुकीत अभिजीत (आबा) पाटील व डॉक्टर बीपी रोंगे सर यांची युती होती त्यामुळे या दोघांना विठ्ठल सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये यश संपादन करता आले मात्र सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्यावर गेल्या बावीस वर्षापासून स्वर्गीय वसंतराव काळे यांचे सुपुत्र चेअरमन कल्याणराव काळे यांची सत्ता आहे तरी यांना आव्हान देण्यासाठी असंख्य युवकांच्या गळ्यातील ताईत खुद्द चेअरमन अभिजीत (आबा) पाटील व स्वेरीचे सर्वेसर्वा डॉक्टर बीपी सर हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत यामुळे पुढे काय? घडते हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

तरी या विचारविनिमय बैठकीस कार्यकर्ते,कर्मचारी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here