चेअरमन अभिजीत पाटील यांच्या मागे आयटी सेल लावले कुणी! (संपूर्ण सोलापूर जिल्ह्याबरोबरच पंढरपूर तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण!)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख तसेच उद्योगपती व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत उर्फ आबा धनंजय पाटील एक असे नाव आहे जे संपूर्ण सोलापूर जिल्हा बरोबरच संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. त्यांच्या मागील पार्श्वभूमीचा आढावा घेतला असता 2016 17 साली त्यांच्यावर वाळूच्या व्यवसायातून एक गुन्हा दाखल झाला होता.

त्यावेळेस पंढरपूर येथे पहिल्यांदाच पोस्टिंग झालेले व सध्या लातूर येथे कारणीभूत असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी निखिलजी पिंगळे साहेब यांनी वाळू व्यवसायातून एक गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतरच्या बऱ्याच कालावधीनंतर, उद्योगपती अभिजीत पाटील यांनी वाळू व्यवसाय थोडासा थांबून आपली सर्व यंत्रणा साखर कारखानदारीकडे वळवली त्यांनी सुरुवातीला चोराखळी येथील एक साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यात घेतला त्यात यश मिळाल्यानंतर त्यांनी लोहा नांदेड व नाशिक जिल्ह्यातील एक कारखाना पुन्हा एकदा भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला अशीच प्रगती होत असताना त्यांनी आपल्या सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ बारा ते पंधरा वर्षे बंद असलेल्या वाकी शिवणे येथील सांगोला सहकारी साखर कारखाना काही दिवसापूर्वी चालवायला घेऊन तो जवळजवळ 35 दिवसांमध्ये सुरू करून त्याच्यामध्ये साखर निर्मिती सुरू केली.

त्याचबरोबर जगभरासह देशात कोरोना सारखा बिकट काळ आला होता त्यामध्ये संपूर्ण देशात ऑक्सिजनची कमतरता भासली यावेळी भारताचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी व तसेच माजी केंद्रीय कृषी मंत्री मा.शरदचंद्रजी पवार यांनी देशातील सर्व व्यवसायीकांना, राज्यकर्त्यांना आवाहन कले होते की, कोरोना काळात ऑक्सिजन प्लांट उभा कराव व ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी मदत होईल तसेच आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व दवाखाने,हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन पुरवता येईल त्या आवाहनानुसार अभिजीत पाटील यांनी पुढाकार घेत उस्मानाबाद येथे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आला व संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ऑक्सिजनचा पुरवढा केला
नंतर त्यांचे लक्ष आपल्या स्वतःच्या तालुक्यातील आपण स्वतः काम केलेल्या व सहकारी असलेल्या व बंद असलेल्या व आर्थिक अडचणीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे लागले होते. त्यांनी त्याची पूर्वीपासूनच मोर्चे बांधणी व निवडणुकीत उतरण्याची संपूर्ण तयारी केली होती व प्रत्येक ठिकाणच्या जाहीर कार्यक्रमांमध्ये ते आपण कारखाना निवडणूक लावून जिंकणार असल्याचे सांगत होते. त्यानंतर मागील दोन महिन्यापूर्वी दिनांक 7 जुलै 2022 रोजी कारखान्याच्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये संपूर्णपणे उद्योगपती अभिजीत आबा पाटील यांच्या संपूर्ण पॅनलने या सहकारी साखर कारखाना निर्विवाद वर्चस्व मिळवले व आपले जवळजवळ वीस संचालक या कारखान्यांमध्ये निवडून आले.
अठरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या व स्व.दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या ताब्यात असणारा हा कारखाना एक नवीन असणाऱ्या, नवतरुण युवकाने, ताब्यात घेतल्यामुळे अनेक जणांच्या “पोटात दुखणार” हे जग जाहीर होते पण ते इतक्या लवकर अभिजीत पाटीलांना अडचणीत आणतील असे कुणालाही वाटले नव्हते? तपास यंत्रणांचा प्रभावीपणे दुरउपयोग करण्यात येत आहे. यामध्ये 2014 पासून या सर्व तपास यंत्रणांचा दुरुपयोग करण्याचे काम चालू झाले असून या माध्यमातून अनेक दिग्गज नेते मंडळी व्यापारी सध्या जेलची हवा खात आहेत; पण साखर कारखानदारी किंवा त्यासंबंधीतील अनेक व्यवसाय उद्योग कुणी करू नयेत का? असाही प्रश्न उपस्थित केला जात असून जे नवतरुण हौशी तरुण आहेत त्यांनी या व्यवसायात उतरू नये का? किंवा एखादा बंद पडलेला किंवा त्या सहकारी संस्थेवर मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा असलेला, सहकारी साखर कारखाना असू दे किंवा इतर कोणतीही संस्था असू दे ती चालवायला घेऊ नये का? असाही प्रश्न आजमितिला, सर्वसामान्य सुशिक्षित तरुण पिढीकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जात आहे.
व अभिजीत पाटील यांच्या मागे आयकर विभाग इतर काही तक्रारी करण्यामागे पंढरपूर तालुक्यातील कोणत्या राजकीय नेत्याचा किंवा तत्सम पदाधिकाऱ्यांचा हात आहे का? हे काही काळानंतर समजेलच पण अशा कुठल्यातरी राजकीय कुरघोड्या, करून सत्ता मिळवता येत नसती किंवा एखाद्या तत्सम व्यक्तीला बदनाम करता येत नसते;हे बहुतेक त्यांना माहिती नसावे; आजपर्यंत पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठे दिग्गज राजकारणी,व्यापारी होऊन गेले पण कमी कालावधीमध्ये साखर कारखानदारी व त्या संबंधित यशस्वीपणे चालवून दाखवणारे एकच उद्योजक म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभिजीत पाटील यांचे नाव घेतले जाते. मग या व्यक्तीच्या नावाला व त्यांच्या वर्तुळाला कोणाचा विरोध आहे का? विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाल्यानंतरच आयकर विभाग फक्त येत्या एक ते दीड महिन्यामध्ये कसे काय धाड टाकू शकते? असाही प्रश्न सर्वच अभिजीत पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या व साखर कारखानदाराची निगडित असणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये आज पोट तिडकीनी विचारला जात आहे?

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here