चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी गजानन सहकारी साखर कारखाना अखेर घेतला ताब्यात! (बीड जिल्ह्यातील सर्व सभासद शेतकऱ्यांना पुढील हंगामात न्याय देणार)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सलग अठरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेला पंढरपूर तालुक्यातील कारखाना पंढरपूरचे उद्योगपती अभिजीत पाटील यांनी दिनांक सात जुलै 2022 रोजी ताब्यात घेतल्यानंतर आज बीड जिल्ह्यातील श्री गजानन सहकारी साखर कारखान्याचा ताबा डीव्हीपी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी ताब्यात घेऊन, संपूर्ण सोलापूर जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे हा कारखाना जवळ जवळ 2013 पासून बंद अवस्थेत होता. त्या कारखान्याचा ताबा बँकेकडे होता बँकेचे अधिकृत मॅनेजर श्री खेडेकर साहेबांनी प्रत्यक्ष कारखाना कार्यस्थळ येऊन डीव्हीपी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक अमर धनंजय पाटील यांच्याकडे तो कारखाना रितसर हस्तांतरित केला आहे. संपूर्ण बीड जिल्ह्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी उद्योगपती अभिजीत पाटील यांनी पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये शेवटच्या दिवशी हा कारखाना पण थोड्या दिवसात ताब्यात घेणार असल्याची जाहीर केले होते त्यानंतर बँकांच्या कार्यवाही मध्ये थोडा वेळ गेल्यानंतर हा कारखाना आज अधिकृतरित्या डीव्हीपी उद्योग समूहाच्या ताब्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात येत आहे यावेळी बीडचे आमदार श्री संदीपभैय्या क्षीरसागर, रवींद्र दादा क्षीरसागर श्री अडवोकेट अनंत आखाडे, धाराशिव साखर कारखाना संचालक संतोष कांबळे,सुहास शिंदे, याचबरोबर बँकेचे सर्व अधिकारी कर्मचारी व कारखान्याच्या पंचक्रोशीतील सर्व समाजात शेतकरी बांधव या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट-
येणाऱ्या काळात हंगामामध्ये बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त ऊस गाळप करून सर्व शेतकरी सभासदांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार त्याचबरोबर योग्य तो दर देऊन सर्व समाजात शेतकऱ्यांसाठी काम करणार!
अमर धनंजय पाटील

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here