चि‌.नितीन व संध्याराणी यांचा साखरपुडा अत्यंत थाटात संपन्न! (समारंभास सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

चि‌.नितीन व संध्याराणी यांचा साखरपुडा अत्यंत थाटात संपन्न!

(समारंभास सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती)

प्रसिद्ध उद्योगपती उद्योग समूहाचे प्रमुख विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन यांचे स्विय सहायक, नितीन सरडे व संध्याराणी यांचा पंढरपूर येथील संस्कार मंगल कार्यालय येथे शाही साखरपुडा समारंभ संपन्न झाला.

श्री रघुनाथ रामराव सरडे,देगाव, यांचे चिरंजीव त्यांचप्रमाणे शेळवे येथील बापूसाहेब गोवर्धन गाजरे यांची कन्या-संध्या राणी यांचा शाही साखरपुडा समारंभ संपन्न झाला. या समारंभास डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्याबरोबर कार्यकारी संचालक अमर पाटील, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग-व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश दादा फाटे, पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर्स, वकील, सर्व सामाजिक संस्थांचे प्रमुख, पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अनेक नेते मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पवित्र अशा मंगल प्रसंगी उभयतांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व पंढरपूर सर्व तालुक्यातील प्रमुख वृत्तपत्रांचे प्रतिनिधी व सर्व चॅनलच्या पत्रकारांनी यावेळी हजेरी लावली..

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here