चिंचोली भोसे येथे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

चिंचोली भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये सदर सालबाद प्रमाणे याही वर्षी शाळा समितीच्या मान्यतेने स्नेहसंमेलन घेण्यात आले,या कार्यक्रमा साठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन मा अभिजित आबा पाटील ,व,पांडुरंग परिवाराचे युवक नेतृत्व मा प्रणव परिचारक उपस्थित होते,चिंचोली भोसे गाव तसे जेमतेम लोकसंख्येचे परंतु लहान मुलांना कलाक्षेत्रात आवड निर्माण व्हावी, व कला क्षेत्र करिअर म्हणून स्विकारावे, तसेच गावातील जेष्ठ मंडळी यांना आपल्या गावातील नवीन पिढी एक वेगळे स्थान निर्माण करु शकतात हा आदर्श निर्माण होऊ शकतो, त्यानिमित्त सदर सालबाद प्रमाणे याही वर्षी स्नेहसंमेलन घेण्यात आले, यावेळी लहान मुलांची कला व स्नेहसंमेलन पाहण्यासाठी परगावाहून व चिंचोली भोसे गावातील अनेक मंडळी उपस्थित होती,लहान मुलांची कला पाहून अनेकांनी कौतुकाची थाप पाटीवर बालकलाकार म्हणून टाकली,या कार्यक्रमासाठी चिंचोली भोसे गावचे सरपंच सौ रतन सुतार, उपसरपंच सौ राधाबाई पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापीका सौ सविता कांबळे मँडम,तसेच पवार मळा मुख्याध्यापीका रेपाळ मँडम,तसेच श्री यादव सर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणपत कांबळे,सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर पवार, गणपत गायकवाड, गणपत पवार, तसेच गावातील अनेक जेष्ठ मंडळी व युवक वर्ग व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here