चव्हाणवाडी वि.वि.का.सेवा. सोसायटीचे सभासदांना १३ % लाभांश वाटप रणजितसिंह (भैय्या) शिंदे यांच्या हस्ते संपन्न!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

माढा तालुक्यातील चव्हाणवाडी येथे आज शुक्रवार दिनांक २१/१०/२०२२ रोजी सकाळी १० वाजता चव्हाणवाडी वि.वि.का.सेवा. सोसायटीचे सभासदांना १३ % लाभांश वाटपाचा कार्यक्रम सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन मा.श्री. रणजितसिंह (भैय्या) शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना श्री रणजितसिंह (भैय्या) शिंदे म्हणाले कि, आपल्या विकास सेवा सोसायटीचे डिसीसी बँकेत एक कोटीची ठेव आहे, सोसायटीस जवळजवळ बारा लाखाऺचा नफा झालेला आहे. त्यामधून साडेचार लाख रुपयाऺचा लाभांश वाटप १३ टक्के प्रमाणे करण्यात आले. हे अत्यंत कौतुकास्पद व चांगल्या कामाची पोहोच पावती आहे . थकीत सभासदांनी डीसीसी बँकेच्या ओटीएस स्कीमचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा.

ते बोलताना पुढे म्हणाले की, आपल्या गावामध्ये जिल्हा दूध संघाची डेअरी सोसायटीमार्फत किंवा जुनी डेअरी असेल तर ती सुरू करावी. त्यासाठी त्वरित परवानगी देत आहोत. दूध संघाची सर्व संकलन केंद्रे ऑनलाईन केली आहेत. त्याठिकाणी टेस्टिंग मशीन, बल्क्युलर संघातर्फे बसवले जाणार आहेत. या सर्वामुळे दूध उत्पादकांना आपल्या दुधाचे फॅट, एस एन एफ व दुधाच्या किमतीचा मेसेज मोबाईलवर जाणार आहे. अशा प्रकारे दुधाची गुणवत्ता अधिक चांगली होत आहे. आता ३,१३ व २३ तारखेला दुधाची पगारही वेळेवर होत असल्यामुळे मार्चमध्ये संघाचे संकलन १७ हजार होते ते आज ४१ हजार लिटर झाले आहे. दूध संघाच्या माध्यमातून डीसीसी बँकेमार्फत दूध उत्पादकांना नवीन गाई खरेदी करण्यासाठी कर्ज वाटप केले जाणार आहे. शेवटी त्यांनी सर्वांना दीपावली निमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब नाना देशमुख , ज्येष्ठ नेते अरुण चव्हाण, अशोक मिस्कीन, माढा तालुका रा. काँग्रेसचे उपाध्यक्ष हनुमंत चव्हाण , सरपंच नवनाथ शिंदे, उपसरपंच बाळासाहेब मोटे, माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संजय मिस्किन, मा. सरपंच सुनील मिस्किन, मा. सरपंच विठ्ठल (तात्या) चव्हाण, अर्जुन सलगर, महावीर नांगरे, डीसीसी बँकेचे शाखाधिकारी भोसले साहेब, टेंभुर्णी डीसीसी बँकेचे महाडिक साहेब, मा. चेअरमन नरहरी नांगरे, सुभाष (काका) चव्हाण, भागवत खडके, सोसायटीचे चेअरमन – कैलास (आप्पा) चव्हाण, व्हाईस चेअरमन अंकुश सलगर, सोसायटीचे सर्व संचालक, सभासद व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here