ग्रामीण भागातील मूलभूत विकास कामांना चालना देण्यासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर – आमदार समाधान आवताडे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या विविध गावांतील मूलभूत विकास कामांना गती देण्यासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध विकास कामांच्या पूर्ततेसाठी आमदार आवताडे यांनी राज्याच्या ग्रामविकास खात्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. सदर मागणीची दखल घेता राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे – पाटील व ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या माध्यमातून व सौजन्याने हा निधी मंजूर झाला असल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले आहे.

योजनेअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील निधी मंजूर झालेली गावे व कामांचे स्वरूप – टाकळी येथील रेल्वे गेट ते कदम वस्ती रस्ता करणे, टाकळी येथील पंढरपूर बायपास ते कदम वस्ती रस्ता करणे, वाखरी येथील ज्योतिबा मंदिर संरक्षक भिंत बांधणे, वाखरी येथील हरी पूजा रेसिडेन्सी अंतर्गत रस्ता करणे, बोहाळी येथील मोरे वस्ती रस्ता करणे, कासेगाव येथील ताटे मळा देशमुख वस्ती रस्ता ते महादेव आर्वे वस्ती रस्ता करणे, इसबावी येथील मज्जिद मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे, कासेगाव येथील कासेगाव अनवली शिव रामचंद्र घोडके घर ते मधुकर शिंदे घर रस्ता करणे, कासेगाव येथील समर्थ नगर ते माणिक गंगथडे रस्ता करणे, कासेगाव येथील शब्बीर इनामदार सर घर ते खंडेराव आण्णा जि प शाळा रस्ता करणे, सिद्धेवाडी येथील सिद्धेवाडी कासेगाव रस्ता करणे, चिचुंबे येथील चिचुंबे कासेगाव रस्ता करणे, कौठळी येथील जयराम वस्ती ते बंधारा रोड करणे,अर्जुन गोडसे घर ते दत्त मंदिर रस्ता करणे एकलासपूर येथील तावशी रोड ते प्रकाश ताड घर रस्ता करणे,नागनाथ (बापू) ताड घर ते गुळ कारखाना रस्ता करणे गोपाळपूर येथील इंदिरा वसाहत येथील बंदिस्त गटार करणे,कोर्टी येथील महादेव ननवरे घर ते सुभाष काळे घर रस्ता करणे, तनाळी येथील मारुती मंदिर ते गणपत हनुमंत लवटे वस्ती रस्ता करणे,मुंढेवाडी येथील संतोष मोरे घर ते पांडुरंग राऊत वस्ती रस्ता करणे,गादेगाव येथील सुरेश नामदेव बागल घर ते राजाराम माळी घर रस्ता करणे,नारायण महादेव बागल घर ते मोहन नामदेव बागल घर रस्ता करणे,टाकळी येथील प्रतिभाताई परिचारक नगर ड्रेनेज लाईन बांधणे.

योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निधी मंजूर झालेली गावे व कामांचे स्वरूप – मंगळवेढा मारापुर ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुधारणा करणे, आंधळगाव ते गोणेवाडी रस्ता करणे, हिवरगाव येथील गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, चोखामेळानगर येथील सांगोला हायवे ते मातोश्री मुक्ताबाई मोहिते पब्लिक स्कूल ते शिवाजी पाटील वस्ती ते आवताडे शेतीपर्यंत रस्ता सुधारणा करणे, चोखामेळानगर येथील शिंदे शेत ते तात्यासाहेब कोंडूभैरी शेत रस्ता सुधारणा करणे, डोणज येथील गावांतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, शिवणगी येथील शिवणगी ते पडवळे वस्ती( येळगी शिव पर्यंत) रस्ता सुधारणा करणे, फटेवाडी येथील विजय फटे ते दगडू सुखदेव फटे घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व गटार बांधणे, ब्रह्मपुरी येथील ब्रह्मपुरी ते मुंढेवाडी रस्त्यापासून तानाजी पाटील ते डबडे वाडी ला जाणारा रस्ता करणे, घरनिकी येथील घरनिकी ते दावल मलिक नगर पर्यंत रस्ता करणे, मल्लेवाडी येथील पिंटू गावडे शेत ते मलकाप्पा गोडसे शेतापर्यंत रस्ता करणे, कात्राळ येथील पिराप्पा खांडेकर घरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, कागष्ट येथील दत्ता काकेकर घरासमोरील रस्ता ते यशवंत काकेकर घरापर्यंत रस्ता करणे, जित्ती येथील गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे, बावची येथील साने गुरुजी वाचनालयास इमारत बांधणे, माचणूर येथील शिवशरण वस्ती मळई (डोके वस्ती) रस्ता रस्ता सुधारणा करणे, तामदर्डी येथील तामदर्डी ते अरबळी रस्ता सुधारणा करणे, हाजापूर येथील हाजापूर गावठाण ते पाझर तलाव कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे, बठाण येथील शेंबडे वडा ते सुब्राव बेदरे शेत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, नंदेश्वर येथील चावडी समोरील व्यापारी गाळ्यासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे, तळसंगी येथील मुंगसे वस्ती शाळा ते कोडगे वस्ती रस्ता सुधारणा करणे, भाळवणी येथील गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, भालेवाडी येथील मंगळवेढा भालेवाडी ते भालेवाडी – डोणज जुना रस्ता करणे, बोराळे येथील बोराळे ते जुना भालेवाडी रस्ता सुधारणा करणे, बोराळे येथील बोराळे ते जुना तामदर्डी रस्ता सुधारणा करणे, सिद्धापूर येथील हिंदू स्मशानभूमी येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे, माळेवाडी येथील गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, खोमनाळ येथील खोमनाळ फटेवाडी ते माणिक पवार यांचे घराकडे जाणार रस्ता सुधारणा करणे, महमदाबाद हु. येथील ग्रामपंचायत जागेत सांस्कृतिक भवन बांधणे, लेंडवे चिंचाळे येथील मुरारवाडी अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, खुपसंगी येथील मरीआई वाले वस्ती अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, महमदाबाद हु.डवरी समाजासाठी स्मशानभूमी शेड बांधणे, रेवेवाडी येथील लक्ष्मी मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, मानेवाडी येथील गडदे वस्ती ते सांगोला शिव रस्ता करणे, खुपसंगी जुनोनी रस्त्यावरून गोपाळवाडी कडे जाणारा रस्ता करणे, देगाव येथील धुळदेव मंदिरास वॉल कंपाउंड करणे, गणेशवाडी येथील बोगद्यापासून आवताडे वस्ती सिताराम बापू सोळगे वस्ती पर्यंत रस्ता करणे, खवे येथील खवे माळेवाडी रस्त्यापासून विष्टवा देवीपर्यंत रस्ता करणे, उचेठाण येथील उचेठाण ते शिंदे वस्ती जुना मुंढेवाडी रस्ता सुधारणा करणे, पाटखळ येथील पाटखळ ते मोरे वस्ती रस्ता सुधारणा करणे, भोसे येथील भोसे ते सिद्धनकेरी रस्ता सुधारणा करणे, गुंजेगाव येथील गुंजेगाव ते आंधळगाव रस्त्यावरून मेटकरीवाडी कडे जाणार रस्ता करणे, लक्ष्मी दहिवडी येथील लक्ष्मी दहिवडी ते चाळीसधोंडा रस्त्यावरून जुगाई मळा श्रीराम वस्ती कडे जाणारा रस्ता करणे, मरवडे येथील बाल उद्यान सुशोभीकरण करणे, निंबोणी येथील गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, अकोला येथील वरकुटे वस्ती ते पांडुरंग इंगळे वस्ती रस्ता करणे, मारापूर येथील मारापुर गावठाण अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसवणे, लवंगी येथील गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here