गोव्यात भाजपाला अनपेक्षित आघाडी, काँग्रेसला मोठा धक्का

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज सुरू आहे. सर्वांचे लक्ष लागूर राहिलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने निर्विवाद बहुमताकडे कूच केली आहे. तर पंजाबमध्ये केजरीवालांचा आम आदमी पक्ष काँग्रेसला झाडून साफ करताना दिसत आहे. तर महाराष्ट्राशेजारील गोव्यामध्ये भाजपाचा पराभव आणि त्रिशंकू विधानसभेचा अंदाज व्यक्त करण्यात येत असताना भाजपाला अनपेक्षित यश मिळताना दिसत आहे. निवडणूक आयोगाकडून देण्यात येत असलेल्या अधिकृत कलांमध्ये भाजपाला १८ जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. तर काँग्रेसला केवळ १० जागांवर आघाडी मिळाली आहे. चार जागांवर मगोप, दोन जागांवर आप, एका जागेवर रिव्होल्युशनरी गोवा तर एका जागेवर गोवा फॉरवर्ड तर चार जागांवर आघाडीवर आहे.

दरम्यान, भाजपाला गोव्यात मिळालेल्या अनपेक्षित आघाडीमागचं मोठं कारण समोर आलं आहे. गोव्यामध्ये भाजपाविरोधात वेगवेगळे लढत असलेल्या विरोधी पक्षांमधील मतांच्या फाटाफुटीचा अनेक मतदारसंघामध्ये भाजपाला फायदा होताना दित आहे. त्यामुळे चुरशीच्या होत असलेल्या अनेक लढतींमध्ये भाजपाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. गोव्यामध्ये भाजपाचा पारंपरिक मतदार भाजपासोबत कायम राहताना दिसत आहे. तर भाजपाविरोधात अनेक पक्ष मैदानात उतरल्याने विरोधी मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी झालेली दिसत आहे. 

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंतच्या मतमोजणीत भाजपाला ३३.६२ टक्के मते मिळाली आहेत. तर काँग्रेसला २२.२५ टक्के मिळाली आहेत. तर मगोपला ८.०३ टक्के, आपला ७.२७, तृणमूल काँग्रेसला ५.४४ टक्के मते मिळाली आहे. मोठा गाजावाजा करून गोव्यात निवडणूक लढवण्यासाठी गेलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अनुक्रमे ०.२२ आणि ०.९७ टक्के मते मिळाली आहेत.

दरम्यान, गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत मतमोजणीच्या दुसºया फेरीअंती काँग्रेशचे धर्मेश सगलानी यांच्यापेक्षा ४१७ मतांनी पीछाडीवर आहेत. विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक निकाल काही तासातच अपेक्षित आहेत. चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर व मनोहर उर्फ बाबू आजगांवकर हे दोन्ही उपमुख्यमंत्रीही पराभवाच्या छायेत आहेत. कवळेकर हे केपें मतदारसंघातून तर आजगांवकर हे मडगांव मतदारसंघातून रिंगणात आहेत. २0१९ साली कवळेकर हे काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये तर आजगांवकर हे मगोपमधून भाजपमध्ये गेले होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here