गुंजेगाव येथील माजी सैनिकाची कन्या बनली गोंदियाची जिल्हाधिकारी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

गुंजेगाव येथील माजी सैनिकाची कन्या बनली गोंदियाची जिल्हाधिकारी

 

गुंजेगाव येथील माजी सैनिक शंकर खांडेकर यांची कन्या नयना खांडेकर(गुंडे) या गोंदियाच्या जिल्हाधिकारी बनल्याने मंगळवेढयाचे नाव आय.ए.एस. अधिकार्‍यांच्या यादीत चमकले आहे.
नयना खांडेकर(गुंंडे) या मूळच्या गुंजेगाव येथील असून त्यांचे वडील सैन्यात असल्याने नयना यांचे शिक्षण हिमाचल प्रदेश,पंजाब या महाराष्ट्राबाहेरील राज्यात झाले आहे.महाविदयालयीन शिक्षण सोलापूरच्या संगमेश्‍वर महाविदयालयात पूर्ण केले असून त्या विदयापीठात टॉपर विदयार्थी म्हणून झळकल्या होत्या.महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमध्ये मुलीमध्ये उपजिल्हाधिकारीपदी सर्वप्रथम आल्या होत्या.त्यांनी सोलापूर पुर्नवसन,कुर्डूवाडी प्रांताधिकारी, नाशिक विभाग म्हाडाच्या मुख्याधिकारी म्हणून सेवा बजावलेली आहे. वर्धा येथे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही पदभार सांभाळला होता. 1992 ला त्या उपजिल्हाधिकारी पदावर उस्मानाबाद येथे पहिली नेमणूक झाली होती.सध्या त्यांना बढती मिळाल्याने गोंदियाच्या जिल्हाधिकारी पदाची सुत्रे त्यांनी हाती घेतली आहेत. त्यांच्या वडिलांचे शिक्षण आय.ए.एस. झाल्याने त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्यामुळे त्या आज जिल्हाधिकारीपदापर्यंत पोहोचल्याचे त्यांच्या कुटूंबियांकडून सांगण्यात आले.वडीलांचे आय.ए.एस. शिक्षण पूर्ण होवून ही त्यांनी सैन्यात आपली सेवा बजावली. जिल्हाधिकारी नयना यांच्या शिक्षणाची सुरुवात हैद्राबाद येथील मिलीटरी स्कूलमधून झाली.त्यांचे मिस्टर डॉ.अर्जून गुंडे हे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here