गादेगावमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
गादेगावमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न.
पंढरपुर तालुक्यातील मौजे गादेगाव येथील ग्रामपंचायतचे विविध विकास कामांचे उदघाटन पार पडले.. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मंजूर असलेल्या अंदाजे 30 लक्ष. रूपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला असून यावेळी गावच्या समविचारी आघाडीचे सर्व प्रमुख नेतेमंडळी तसेच ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,व ग्रा.सदस्य व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.. या दलितवस्ती सुधारणा योजनेअंतर्गत गावठाण दलित वस्ती प्रभाग-5 येथे दहा लक्ष रूपयांचे रस्ता काँक्रिटीकरण,कोर्टी रोड कांबळे-मोरे वस्ती प्रभाग -1 येथे पाच लक्ष रुपयांचे रस्ता काँक्रिटीकरण,झिरपीमळा साबळे-लोंढे वस्ती प्रभाग क्र-2 येथे दोन लक्ष रूपयांचे रस्ता काँक्रिटीकरण,लक्ष्मीनगर दलित वस्ती प्रभाग-2 येथे आठ लक्ष रूपयांचे रस्ता काँक्रिटीकरण,मलिकवस्ती- दलितवस्ती प्रभाग क्र-3 येथे पाच लक्ष रूपयांचे रस्ता काँक्रिटीकरण,सातारनाला व्हनकाडे वस्ती ते शिवरस्ता दलितवस्ती प्रभाग क्र-4 येथे पाच लक्ष रूपयांचे रस्ता काँक्रिटीकरण व शाळेमागील दलितवस्ती प्रभाग क्र-4 येथे पाच लक्ष रुपयाचे वस्ती सुशोभीकरण आदि विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.. सहा महिन्यांपूर्वी गादेगावात परिवर्तन होवून ग्रामपंचायतमध्ये सिध्दनाथ परिवर्तन ग्रामविकास आघाडी या सर्वपक्षीय आघाडीची सत्ता आली.. त्यानंतर विकासकामांचा झपाटा सुरू झाला आहे.. गेल्या सहा महिन्यांपासून अनेक महत्त्वपूर्ण कामे करण्यात आली आहेत. अनेक लोकहिताचे निर्णय घेतले गेले आहेत.
तसेच गावठाणाप्रमाणे वाड्यावस्त्यांवर देखील विकासाची कामे सुरू आहेत.
गावच्या संपुर्ण विकासासाठी विविध नेते मंडळी एकत्र येत गावाचा चेहरा बदलत आहेत.. येत्या काळात अधिक वेगाने विकास कामे होवून अधिक कामे होवून गादेगावचा विकास होईल अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करत असून चालू असलेल्या कामांबाबत ही गावकर्यांमधुन समाधान व्यक्त होत आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here