गणेश मंदिर पूर्ववत करून द्या अन्यथा संबधित अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासणार:राजकुमार स्वामी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

गणेश मंदिर पूर्ववत करून द्या अन्यथा संबधित अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासणार:राजकुमार स्वामी

प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष मंगळवेढा

माचणूर येथील मंदिर खूप प्राचीन आहे . महाराष्ट्रासह आंध्र ,कर्नाटक येथील लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात अशा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सिध्देश्वर मंदिरतील गणेश मंदिर या ठिकाणी पुरातन विभागाकडून तोडफोड करण्यात आले.
माचणुर येथील मंदिर हे पुरातन स्मारक नसून मंदिर आहे असे मंदिराचे पुजारी व ग्रामस्थांनी वेळोवेळी सांगून देखील पुरातत्व खात्याकडील मस्तीवन अधिकाऱ्याने सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना घेऊन मंदिराची नासधूस केली.
पुरातत्त्व खात्याच्या कचाट्यातून याची मुक्तता करण्याची मागणी मंदिराचे पुजारी यांनी केली. या खात्याचा कंत्राटी सफाई कामगार कधीही मंदिराची सफाई करत नसून पुजाऱ्यांना व भाविकांना कायद्याची भीती दाखवून अरेरावी ची भाषा करत असल्याचीही तक्रार पुजारी व ग्रामस्थांनी केली. या मस्तिवान अधिकाऱ्यांनी तात्काळ गणेश मंदिर पूर्ववत करून द्यावे अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फसण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी दिला.यावेळी
तालुका कार्याध्यक्ष अमोगसिद्द काकनकी, संपर्क प्रमुख , तानाजी माने,तालुका उपाध्यक्ष चेतन वाघमोडे,दत्ता पाटील,विलास सरगर विभाग प्रमुख नवनाथ सिरशटकर याचबरोबर माचणूर ग्रामपंचायतचे मिस्टर सरपंच प्रकाश डोके, उपसरपंच उमेश डोके, विठ्ठल डोके, विलास डोके, ब्रम्हपुरी सरपंच मनोज पुजारी, सुनील डोके, मंदिराचे पुजारी सतीश चौगुले, दामाजीचे संचालक राजेंद्र पाटील, विजयसिंह पाटील, राजीव बाबर, जनार्दन शिवशरण, पोलिस पाटील सुहास डोके, प्रशांत पाटील व पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान दुपारी ०३:०० वा दरम्यान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते यांनी मंदिरास भेट देत घडलेला प्रकार अयोग्य असून पुरातत्व खाते व ग्रामस्थांनी समन्वयाने मंदिराच्या बाबतीत निर्णय घेतले पाहिजेत असे मत व्यक्त केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here