खेडभोसे येथे नुतन सरपंच उपसरपंच यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर तालुक्यातील खेड भोसे येथील लोकनियुक्त सरपंच सौ.सुरेखा संजय देवळे व बिनविरोध उपसरपंच सौ.अश्विनी चंद्रकांत पवार यांचा व नुतन ग्रामपंचायत सदस्यांचा खेड भोसे येथे विठ्ठल परिवाराचे पॅनल निवडून आल्याने सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे,मनसे नेते दिलीप धोत्रे, विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे मा. अॅड. गणेश (दादा) पाटील,शेखर भालके, यांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे म्हणाले की,प्रथम जे सदस्य निवडून आले त्यांचा आनंद आहे.परंतू ज्यांनी हे पॅनल निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे अभिनंदन करतो. विशेषतः ज्यांना ज्यांना वाटले आता यांच्यात आता मेळ नाही अशा लोकांनी इथे येऊन पहावे हा संपूर्ण विठ्ठल परिवार एक संघटीतच आहे. या गावातील राहिलेला विकास असेल तो सर्वांच्या सहकार्याने पुर्णत्वास नेवू असा विश्वास यावेळी बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिला.

यावेळी अॅड गणेश पाटील बोलताना म्हणाले की, गावातील मतभेद बाजूला ठेवून आपली ग्रामपंचायत कशा पद्धतीने येईल याचा विचार करून जेष्ठ नेतेमंडळींनी पुढाकार घेतला आणि खेडभोसे येथे आपली ग्रामपंचायत निवडणून आली.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अतुल खरात हे सुद्धा खेड भोसेच्या विकासात योगदान देत असून आरोग्य उपकेंद्ररास देखील मंजूरी मिळाली आहे. अशाच पद्धतीने निवडणून आलेले सरपंच,उपसरपंच व सदस्य असलील यांच्या सहकार्याने भविष्यात विकास कामे होत राहतील पार्टी टिकवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले आणि भविष्यात अशाच प्रकारे गावाचा विकास व्हावा अशे मत व्यक्त केले.

यावेळी विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील बोलताना म्हणाले की, खेडभोसे येथे विठ्ठल परिवार एकसंघ ठेवण्यासाठी सर्वच जेष्ठ नेते मंडळींच्या पाठिंब्याने विठ्ठल परिवाराचे पॅनल निवडून आले. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आज विठ्ठल सहकारी साखर कारखाना चांगल्या पद्धतीने सुरू आहे व शेतक-यांना देखील चांगला भाव मिळत आहे. एका बाजूला त्यांनी सांगायचे लय भारी कारखाने चालवतोय म्हणून त्यांचे आता दिवाळखोरीत. म्हणून खेडभोसेच्या निवडणुकीत आपल्याला घवघवीत यश मिळाले भविष्यात ग्रामविकासाठी, विशेष योजना राबविण्यासाठी, विविध उपाययोजना करण्यासाठी आमदार, खासदार यांच्या निधीतून आपल्याला मदत करण्याची आमची सदैव भूमिका राहील असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात,कृण्णांत माळी, विठ्ठल कारखान्याच्या व्हा. चेअरमन सौ. प्रेलताताई रोंगे,करकंब पोलिस स्टेशनचे ए.पी.आय.मा.निलेश तारू साहेब,गटविकास अधिकारी मा. प्रशांत काळे,नितीन खटके,सुधाकर कवडे,भिमराव माळी, कॉंग्रेसचे हणमंत मोरे,पोपट पवार,सिद्धेश्वर पवार,बंडू पवार, ग्रामसेवक वैभव गायकवाड,शिवाजी पवार, लक्ष्मण पवार, भिवा पवार, आप्पा पवार, बबन पवार, व आदि पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here