खाजगी सावकारांप्रमाणे फायनान्स व बँकावरही कारवाई करा. महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मा. पोलीस आयुक्तांना निवेदन.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

खाजगी सावकारांप्रमाणे फायनान्स व बँकावरही कारवाई करा. महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मा. पोलीस आयुक्तांना निवेदन.

सोलापूर // प्रतिनिधी 

कोरोना महामारी, लॉकडाऊन व महागाईने होरपळलेल्या गरीब कष्टकरी कामगार कुटुंबिय विविध कारणात्सव फायनान्स कंपनी, खाजगी व सहकारी बँकाकडून घेतलेले कर्ज वेळेवर न भरल्यास या वित्तीय संस्था गुंडगिरी करत आहे. म्हणून खाजगी सावकारांप्रमाणे या वित्तीय संस्थांवर कारवाई करून गरीब कुंटुबियांवर होणारे अन्याय दूर करावे. अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे यांना मेलद्वारे दिल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
मा. पोलीस आयुक्त यांना दिेलेल्या निवेदनात आपण सोलापूरातील खाजगी सावकारांना कायदा काय असतो हे दाखवून देऊन खाजगी सावकारांना एक प्रकारचे जरबच बसविलात. त्यामुळे खाजगी सावकारांचे सळो की पळो झाले. यामुळे गरिब लोकांचा तुम्हाला आर्शीवाद मिळाले. आणि खाजगी सावकार सगळेच अदृष्य झाले. आणि गरीब कर्जदार सुखाने राहु लागला त्यामुळे आपले खूप खूप अभिनंदन. साहेब खाजगी सावकारांचा बंदोबस्त झाला पण आतातर फायनान्स कंपन्या, पतपेढी, सहकारी, खाजगी आणि विविध वित्तीय संस्था आर.बी. आयच्या नियमांचे उल्लघंन करून कर्जदारांना कर्ज देत आहेत. पण वसुली करतांना कायद्याचा कुठलाही आधार न घेता मनमानी प्रमाणे दंड, व्याज लावून कर्ज वसुली करीत आहेत. यामध्ये अत्यंत गंभीर बाब म्हणजे या फायनान्स, बँका व वित्तीय संस्था कर्ज वसुली करण्यासाठी भाडोत्री गुंडाचा वापर करीत आहेत. किंवा कर्ज वसुलीवर कमिशन या धर्तीवर गुंड लोकांना नेमणूक करून कर्ज वसुली करीत आहे. खर पाहता कर्जदार कर्ज न दिल्यास कायदेशीर मार्गाने कर्ज वसूली केली पाहिजे. तसे न करता कर्जदारांच्या घरी वेळी अवेळी जाऊन घरात पुरुष माणूस नसतांना महिलाना धमखावणे, शिवीगाळ करणे व तुमच्या घरातले पुरुष माणुस आल्यावर फायनान्स कंपनीकडे पाठवा नहीतर आम्ही परत रात्री अपरात्री येतो असे धमखावून जातात असे प्रकार मोठ्या प्रमाणात सर्रासपणे करीत आहेत. काही संस्थातर बचत गटाच्या नावाखाली खाजगी सावकारी धंदा करीत असल्याने दिसून बचतीद्वारे पैसे न भरलयास घरच्या पुरुष माणसानांच उचलून नेणे, कर्जदाराच्या घरी येऊन दिवसभर घरातून न जाणे, पैसे दिल्या शिवाय जाणार नाही असे म्हणून घरात बसणे असे प्रकार ही करीत आहे. यापूर्वी असे प्रकार बचत गटाच्या नावाखाली खाजगी सावकारी करणाऱ्या फायनान्स कंपन्या करीत होते. आणि आताही करीत आहेत. पण आतातर सर्व बँका, पतपेढी व वित्तीय संस्था करीत आहेत.
गेल्या काही दिवसापूर्वी चार हुतात्मा पूतळा चौकात फायनान्स कंपनीचे कर्मचारी व कर्जदार यांच्यात झालेला मारहाणीचा प्रकार हे अशाच कारणावरून झाला आहे. वेळीच पोलीसांनी दखल घेतल्यामुळे पुढील अनर्थ ठळला. म्हणून पा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे साहेब आपण खाजगी सावकार, गुंड, दोन नंबर धंदेवाले यांना जसे सरळ केले तशाच पध्दतीने बँक नावाचा बुरखा घालून सावकारी धंदा करणाऱ्या बँका, पतसंस्था व इतर वित्तीय संस्थांचा व्यवहारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व गरीब कामगार कुटुंबियाना या बँकरूपी सावकारांपासुन वाचवावे. ही नम्र विनंती. असे नमुद केले आहे.
सदर निवेदनाचे प्रत मा. मुख्यमंत्री, मा. कामगार मंत्री, मा. कामगार राज्यमंत्री, मा. अर्थमंत्री, मा. पालकमंत्री, मा. जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहेत. असेही पत्रकात नमूद आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here