क्षितीज सारख्या स्पर्धांमधून आत्मविश्वास वाढतो – अमेरिकेतील युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंडचे रोहित उमर्जीकर स्वेरीत ‘क्षितीज २ के २२’ कार्यक्रमाचे उदघाटन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
पंढरपूर- ‘शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी कलात्मक गुणांमध्ये सुद्धा परिपूर्ण असणे गरजेचे असते. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजन केलेल्या अशा उपक्रमांमधून मुलांचे कौशल्य दिसून येते. यामधून मुलांना प्रेरणा मिळून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. क्षितीज २ के २२’ इव्हेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बौद्धिक क्षमतेला संशोधनाकडे नेण्यासाठी प्रेरणा मिळते. त्यामुळे विद्यार्थी अधिकाधिक संशोधनात आपला वेळ घालवून नवीन निर्मिती करत आहेत.’ असे प्रतिपादन अमेरिकेतील युनायटेड बँक ऑफ स्वित्झर्लंड या बँकेचे टेक्निकल इंजिनिअर व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे माजी विद्यार्थी रोहित उमर्जीकर यांनी केले.
     येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूरमध्ये मेसा (मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन), द इन्स्टिटयूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडीया), कोलकाता स्टुडंट्स चॅप्टर आणि अमेरिकन सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनींग (अॅश्रे) च्या पुणे चॅप्टर (अॅश्रे) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीत मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाने आयोजिलेल्या ‘क्षितीज  २ के २२’ या तांत्रिक संशोधन उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना यु.बी. एस. बँकेचे टेक्निकल इंजिनिअर व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे माजी विद्यार्थी रोहित उमर्जीकर मार्गदर्शन करत होते. स्वेरीमधील आठवणींना उजाळा देताना पुढे ते म्हणाले की, ‘पंधरा वर्षांनंतर आज ‘स्वेरी’ मध्ये आल्यानंतर असे जाणवते की स्वेरीने उत्तरोत्तर खूपच प्रगती साध्य केलेली आहे. मला माझ्या कॉलेज जीवनात हॉस्टेलच्या संदर्भात स्वेरीची खूप आर्थिक मदत झाली. डॉ. बी.पी. रोंगे सरांनी व स्वेरीने  दिलेल्या संस्कारांच्या शिदोरीवर आज परदेशात देखील मी स्वतःच्या पायावर ठाम उभा आहे. स्वेरीने आज विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट प्लेसमेंट सोबतच खूप सोयी सुविधा निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा स्वेरीकडे वाढता कल दिसून येत आहे.’ स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिलेल्या या कार्यक्रमात प्रारंभी मेसाचे अध्यक्ष स्वप्नील माशाळकर यांनी प्रास्तविकात ‘क्षितीज २ के २२’ इव्हेंट विषयी सविस्तर माहिती दिली. त्यात विविध संशोधन स्पर्धा, मिळणारी बक्षिसे याविषयी त्यांनी माहिती दिली. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये जनरल क्विझ, कॅम्पस रिक्रूटमेंट प्रोसेस, पेपर प्रेझेंटेशन, बी.जी.एम.आय., कॅड वॉर व पोस्टर प्रेझेंटेशन यासारख्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मेकॅनिकल इजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एस.एस. वांगीकर यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना संशोधन स्पर्धेसाठी प्रेरित केले. या सर्व स्पर्धा योग्य नियोजनामुळे सुरळीतपणे पार पडत आहेत. या स्पर्धात्मक उपक्रमासाठी बाहेरील महाविद्यालयातून जवळपास तीनशेहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग घेतला आहे. स्पर्धा जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून  स्मृतीचिन्हे व प्रमाणपत्र तर प्रमुख पाहुण्यांच्या वतीने स्पर्धेतील प्रत्येक विभागातील प्रथम विजेत्यास अमेरिकन एक डॉलर भेट म्हणून मिळणार आहे. यामध्ये महाविद्यालयातर्फे एकूण पंधरा हजार रुपयांची बक्षिसे विजयी स्पर्धकांना देण्यात येणार आहेत. यावेळी डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी.मिसाळ, प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. मिलिंद कुलकर्णी, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. करण पाटील, क्षितीजचे समन्वयक प्रा. संजय मोरे, मेसा उपाध्यक्ष अविराज नागटिळक, मेसाचे पदाधिकारी व विविध महाविद्यालयांतून आलेले सहभागी विद्यार्थी, स्वेरीचे प्राध्यापकवर्ग उपस्थित होते. मेसाच्या सचिवा दीप्ती कदम व निखील शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. 
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here