क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले उमाजीनाईक यांची जयंती उत्साहात साजरी!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(रक्तदान शिबिराचे केले मा. रणजीतभैया शिंदे यांनी केले उद्घाटन)

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

मौजे – वेणेगाव (पंढरपूर चौक),ता – माढा येथे आज सोमवार ‌दिनांक ११/०४/२०२२ रोजी सकाळी ९:०० वाजता सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन मा. श्री. रणजित (भैय्या) शिंदे यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले व उमाजी नाईक यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले तसेच उमाजी नाईक रामोशी संघटना व महात्मा फुले प्रतिष्ठान वेणेगाव यांच्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांच्यासमवेत मा. समाजकल्याण सभापती श्री.शिवाजी कांबळे, जि. प.सदस्य श्री. बंडूनाना ढवळे, राजाभाऊ शिंदे, भारत बावळे,उमाजी नाईक संघटनेचे अध्यक्ष अंकुश जाधव, रमेश शिंदे, सागर शिंदे,बापूसाहेब जाधव, सतीश माने, राजूभाऊ कदम ,राहुल मदने तसेच वेणेगाव व परिसरातील गावचे तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here