कोरोना कालावधीत निराधार झालेल्या विद्यार्थ्यांचे पालकत्व वसंतदादा काळे शैक्षणिक संकुलाने स्वीकारले राज्यातील पहिला आदर्श उपक्रम

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

कोरोना कालावधीमध्ये अनेकांचे पालकत्व हरवले अशा विद्यार्थ्यांना मायेचा आधार देऊन शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी वसंतराव काळे शैक्षणिक संकुलाने राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी व्यक्त केले.ते वाडीकुरोली ता. पंढरपूर येथील वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात आज कोरोनामुळे आई वडिलांचे दुर्दैवी निधन झाल्याने निराधार झालेल्या विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांना शालेय साहित्य व इयत्ता बारावी पर्यंत दरमहा 1000 रुपये आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेल्या वसंतदादा काळे शैक्षणिक पालकत्व योजने प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले भावनिकतेपेक्षा संवेदनशीलता महत्त्वाचे असून ती समाजउपयोगी प्रत्यक्ष उपक्रमातून कृतीतून दिसून येते याच सामाजिक बांधिलकीतून हा आदर्श उपक्रम होतआहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याण काळे हे होते अध्यक्षीय भाषणात काळे म्हणाले की विद्यार्थी केंद्रबिंदू मानून वसंतदादा काळे यांच्या प्रेरणेतून आजपर्यंत उज्वल शैक्षणिक वाटचाल चालू आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहून संस्थेने वेगवेगळे उपक्रम राबवून आधार दिला आहे कोरोना मुळे ज्यांचे पालकत्व हरपले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना मायेचा आधार देण्यासाठी शैक्षणिक साहित्याबरोबरच भरीव आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी दिनकर चव्हाण सुधाकर कवडे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे त्यांनी केले यावेळी महादेव नाईकनवरे ,रावसाहेब देशमुख, युवा गर्जनाचे अध्यक्ष समाधान काळे ,राजाभाऊ माने ,विजय कदम जुलूस शेख, नवनाथ माने,माजी संचालक हनुमंत सुरवसे वसंतदादा मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुधीर शिनगारेमाजी प्राचार्य हणमंत जमदाडे शिवाजीराव बागल मुख्याध्यापक दादासो खरात शिवाजी शेंडगे संतोष गुळवे नंदकुमार दुपडे व पालक उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.समाधान काळे व संजय कुलकर्णी यांनी केले व उपस्थितांचे आभार मुख्यध्यपक अनिल कौलगे यांनी मानले

चौकट -शैक्षणिक संकुलाच्या वतीने राबवलेला राज्यातील पहिला उपक्रम असून वसंतदादा काळे पालकत्व योजनेच्या माध्यमातून संस्थेत शिक्षण घेत असलेल्या पाचवी ते बारावी , आयटीआय ,नर्सिंग पर्यंतचा संपूर्ण खर्च , शैक्षणिक साहित्य व मुलांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दरमहा 1000 रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here