कॉंग्रेस पक्ष हा सर्व जातीधर्माना बरोबर घेऊन काम करणारा पक्ष आहे:- आ. प्रणितीताई शिंदे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कॉंग्रेस पक्ष हा सर्व जातीधर्माना बरोबर घेऊन काम करणारा पक्ष आहे:- आ. प्रणितीताई शिंदे

युवा नेते ईलियास शेख यांच्या काँग्रेस संपर्क कार्यालयाचे उद्घघाटन

 

सोलापूर // प्रतिनिधी 

शास्त्री नगर, शानदार चौक, सोलापूर येथे शेख ईलियास अब्दुल लतीफ यांचे काँग्रेस संपर्क कार्यालयाचे उद्घघाटन मा.आ. प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले, चेतन नरोटे, रुबीना फिरोज – (नगरसेविका, मिराभाईंदर मुंबई), आरिफ शेख, मनोज यलगुलवार, इम्रान खान, अब्दुल लतीफ शेख, शकिल मौलवी, रमेश कैरमकोंडा, रुस्तुम कंपली, रफिक चकोले, जुबेर कुरेशी, मुजाहिद जमादार यांच्या उपस्थित फित कापुन करण्यात आले.

यावेळी आपले विचार व्यक्त करताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की इलियास शेख सारखे सुशिक्षत युवक कॉंग्रेस पक्षात प्रवेश करून जनतेचे प्रश्न सोडवू इच्छितात हे काँग्रेससाठी निश्चितच चांगली गोष्ट आहे. त्यांचे वडील लतीफ शेख हेही गेली चाळीस वर्षे काँग्रेसचे काम करतात हेही गौरवास्पद आहे. आपण संकटात असताना गडप होणारे भाजप, मोदी, शहा, वंचित, एमआयएम सारखे पक्ष जातीधर्मात भांडणे लावून यावर आपले राजकारण करत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वाधिक त्याग बलिदान कॉंग्रेस पक्षाने दिले आहे याचा आम्हाला गर्व आणि अभिमान आहे. कॉंग्रेस पक्ष सर्वधर्माना बरोबर घेऊन काम करणारा पक्ष असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जो आपले काम करतो, आपल्या सुखदुःखात आपल्या बरोबर असतो आपल्या संकटात कामाला येतो त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. आगामी महापालिका निवडणुकीत शास्त्री नगर भागातून जास्तीत जास्त कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून येण्यासाठी जनतेने साथ द्यावी असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.

सदर कार्यक्रमात चेतन नरोटे, रुबीना फिरोज यांनी ईलियास शेख सरांचे कौतुक केले व सविस्तर सखोल माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वजाहत अब्दुस सत्तार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश वाले होते. शेवटी प्रमुख पाहुण्यांचे एजाज शेख सरांनी आभार मानले.
सदर संपर्क कार्यालयाचे उद्घघाटन कार्यक्रमात प्रभागातील नामाकिंत लोक उपस्थित होते. मुस्ताक लालकोट, सादिक कुरेशी, कय्युम बलुलखान, अंबादास गुत्तीकोंडा, रज्जाक कादरी, जाकिर शहापुरे, अल्ताफ सिद्दीकी, इद्रिस पेरमपल्ली, जाकिर इनामदार, वजीर शेख, बखशो शेख, फेरोज़ शेख, निदा शेख, इशतियाक तारानाईक सर आदि उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात इ.12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुणे मा.प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उर्दु टिचर क्लब (UTC), शानदार चौक फ्रेंड क्लब आदि मित्र परिवाराने परिश्रम घेतले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here