कॉंग्रेस पक्ष बळकटीसाठी सोलापूर शहरातील तिन्ही विधानसभेत जास्तीतजास्त कॉंग्रेस डिजीटल सभासद नोंदणी करावी. – आ. प्रणिती शिंदे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहरातील काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणी अभियानाबाबत आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, प्रमुख नोंदणीकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी सर्वात जास्त डिझिटल सभासद नोंदणी केल्याबद्दल नगरसेविका फिरदोस पटेल, सुशील बंदपट्टे, सागर शहा, कुणाल गायकवाड यांचा आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या आढावा बैठकीचे प्रास्ताविक संजय हेमगड्डी यांनी केले.

यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, काँग्रेस पक्षाला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा आहे. अनेक लाटा येतील आणि जातील. मात्र, काँग्रेस हा गोरगरीबांच्या व सर्वसामान्यांच्या विकासासाठी तळागाळापर्यंत जाऊन काम करणारा पक्ष आहे. कॉंग्रेस पक्ष वाढविण्यासाठी सर्वांनी शहरातील तिन्ही विधानसभेत जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी. आणि या कॉंग्रेस डिझिटल सभासद नोंदणीच्या माध्यमातून सोलापूर शहर पिंजून काढणार असून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने केलेल्या लोकपयोगी कामाच्या बळावर व नवीन युवा सदस्यांच्या सहभागाने महापालिकेच्या निवडणुकीची जय्यत तयारीनिशी सामोरे जाऊन सोलापूर महापालिकेवर तिरंगा फडकाविणार.

या आढावा बैठकीस माजी महापौर कॉंग्रेस शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, सोमपा गटनेते चेतन भाऊ नरोटे, नगरसेवक शिवा बाटलीवाला, रियाज हुंडेकरी, प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, हाजी तौफीक हत्तुरे, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका परवीन इनामदार, फिरदोस पटेल, वैष्णवीताई करगुळे, प्रदेश चिटणीस ऍड मनीष गडदे, प्रा. नरसिंह आसादे, किसन मेकाले गुरुजी, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, देविदास गायकवाड, उदय चाकोते, बाबुराव म्हेत्रे, लक्ष्मीकांत साका, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे, सेवादल प्रदेश पदाधिकारी अशोक कलशेट्टी, अंबादास गुत्तीकोंडा, युवक मध्य योगेश मार्गम, विवेक कन्ना, माजी नगरसेवक हारून शेख, मधुकर आठवले, जेम्स जंगम, शोकत पठाण, सिद्राम अट्टेलुर, नागनाथ कासलोलकर, वाहिद नदाफ, रफिक इनामदार, तिरुपती परकीपंडला, सुशील बंदपट्टे, सागर शहा, कुणाल गायकवाड, युवराज जाधव, सुनील सारंगी, संजय गायकवाड, नागनाथ बंगाळे, अनिल मस्के, मल्लिनाथ सोलापुरे, शिवशंकर आजनाळकर, राहुल वर्धा, परशुराम सत्तारेवाले, महेश लोंढे, राहुल गोयल, महेश जोकारे, प्रवीण जाधव, श्रद्धा हुल्लेनवरू, प्रियांका डोंगरे, इलिहास शेख, दीनानाथ शेळके, श्रीकांत वाडेकर, प्रतीक आबुटे, सोहेल पठाण, सुभाष वाघमारे, जीलानी शेख, V D गायकवाड, अनिल हळकट्टी, निखिल पवार, किरण राठोड, शिवराज कोरे, नूर अहमद नालवार, पंडित गणेशकर, शाबाज हुंडेकरी, शिवाजी पवार, विशाल गायकवाड, अजय सुगरे, उमेश बंदपट्टे, इम्तियाज वळसांगकर, यांच्यासह इतर पदाधिकारी, नोंदणीकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here